आष्टी तालुक्यातील महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले असून, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत असले तरी येताना व जाताना बससेवा अद्यापही सुरू झाली नसल्याने मुलांना मिळेल त्या खासगी वाहनांचा आधार घेऊन जावे लागत आहे. ग्रामीण भागातील बससेवा बंद असल्याने ही परिस्थिती आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित ग्रामीण भागातील बससेवा सुरू कराव्यात. घरातून निघालेली मुले अशी खचाखच भरलेल्या वाहनाने प्रवास करतात. जर काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू कराव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब जगताप यांनी केली आहे.
याबाबत आष्टी येथील आगार प्रमुख संतोष डोके यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रवासी व विद्यार्थी नसल्याने ग्रामीण भागातील बस बंद केल्या आहेत. आदेश येताच बसेस पूर्ववत सुरू होतील, असे त्यांनी लोकमतला सांगितले.
फोटो- आष्टी तालुक्यातील कडा लिंबोडी, खिळद, पाटण बससेवा बंद असल्याने महाविद्यालयीन मुलांना शिक्षणासाठी असा जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे बोलके छायाचित्र.
===Photopath===
050321\nitin kmble_img-20210304-wa0030_14.jpg