शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

धावत्या बाइकवर रिल्स बनवताना आयुष्य थांबले; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याचे पाय निकामी

By सोमनाथ खताळ | Updated: July 6, 2024 16:09 IST

बीड जवळील बायपासवरून जाताना दोन मित्र धावत्या दुचाकीवर रिल्स बनवत असताना दुर्घटना

बीड : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रिल्सच्या नादात कार दरीत कोसळून युवती मयत झाल्याची घटना ताजी असतानाच बीडमध्येही रिल्सच्या नादात एकाचा जीव गेला आहे. जालन्याहून तुळजापूरला निघालेल्या दोन मित्रांनी धावत्या दुचाकीवर रिल्स बनवली. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी कठड्याला धडकून अपघात झाला. यात मागे बसलेला एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी असून त्याच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारच्यावेळी बीड बायपासवर घडली. हे दोन्ही मित्र जालना येथील रहिवाशी आहेत.

अनिरूद्ध कळकुंबे (वय २५) असे मयताचे नाव आहे. तर मधु शेळके (वय ३० दोघेही रा. गणेशपुर, जालना) हा जखमी आहे. दोघेही शुक्रवारी सकाळीच दुचाकीवरून (एमएच २१ एम ११५४) बीडमार्गे तुळजापूरला जात होते. मधु हा दुचाकी चालवत होता तर अनिरूद्ध मागे बसलेला होता. बीड बायपासवर आल्यावर दुचाकीवर असतानाच अनिरूद्ध याने आपल्या मोबाईल रिल्स बनवण्यासाठी व्हिडीओ तयार करू लागला. यावेळी दुचाकी चालक असलेल्या मधुचे लक्ष विचलीत झाले असून बाजूच्या कठड्यावर जावून दुचाकी आदळली. यामध्ये डाेक्याला व छातीला मार लागल्याने अनिरूद्धचा जागीच मृत्यू झाला तर कठडा व दुरपर्यंत फरपटत गेल्याने मधुच्या दोन्ही पायांचा चुराडा झाला. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला असून तो सोशल मिडयावरही व्हायरल झाला आहे. या दोघांनाही जिल्हा रूग्णालयात दाखल केले हाेते. जखमीला छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले होते. याप्रकरणाची शनिवारी दुपारपर्यंत बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली नव्हती.

सुलीभंजनची घटना ताजी असतानाच...धार्मिक व पर्यटनस्थळ असलेल्या सुलीभंजन येथील दत्तधाम मंदिर परिसरात रिल्स बनविताना कार दारीत कोसळून झालेल्या अपघातात श्वेता दिपक सुरवसे (२३, रा.हनुमाननगर,छत्रपती संभाजीनगर) या युवतीला प्राण गमवावा लागला होता. ही थरारक घटना १७ जून रोजी दुपारी २ वाजेच्या दरम्यान घडली होती. श्वेता ही ही मित्र शिवराज संजय मुळे (२५, रा.हनुमान नगर) याच्यासोबत कारमधून ( क्रमांक एम.एच.२१,बी.एच.०९५८) सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात गेली होती. येथे श्वेताने कार चालवत असतानाच रिल्स बनविण्यास शिवराज यास सांगितले. मात्र, रिव्हर्स गिअर पडून एक्सलेटवर दाब पडल्याने कार वेगाने मागे जात थेट डोंगरावरुन खाली दरीत कोसळली. या भीषण अपघातात श्वेताचा जागीच मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच बीडमध्ये रिल्सच्या नादात एका तरूणाचा जीव गेला आहे.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया