शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सोडून आला अन् शेतीत रमला; टरबूज लागवडीतून अखिल पटेल झाला लखपती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 07:47 IST

दिंद्रुड येथील अखिल पटेल यांचा मुंबईमध्ये मीठ व्यवसाय होता. वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून त्यांना मिळायचे.

- संतोष स्वामी दिंद्रुड (जि. बीड) : पैसे कमविण्यासाठी ग्रामीण भागातून शहरी भागाकडे युवकांचा कल असतो. शहरी भागात विविध मार्गातून पैसे कमवायच्या संधी असतात. मात्र दिंद्रुड येथील एक तरुण मुंबईचा चालू व्यवसाय बंद करून गावी शेती सांभाळण्यासाठी परतला आणि इथेच रमला. टरबुजाची आधुनिक शेती करीत या शेतकऱ्याने केवळ तीन महिन्यात चार लाखांचे उत्पन्न मिळवले आहे.

दिंद्रुड येथील अखिल पटेल यांचा मुंबईमध्ये मीठ व्यवसाय होता. वर्षाकाठी १० ते १५ लाख रुपयांचे उत्पन्न या व्यवसायातून त्यांना मिळायचे. मात्र गावाची व शेतीची ओढ त्यांना दिंद्रुडात परत घेऊन आली. दिंद्रुड येथील काजीबा देवस्थानची तीन एकर इनामी जमिनीची देखरेख अखिल करतात. पारंपरिक शेतीला छेद देत अभिनव पद्धतीने टरबूज या नगदी पिकाची लागवड त्यांनी गतवर्षीपासून सुरू केली. १० जानेवारीला लावलेल्या टरबुजाच्या रोपट्यांनी आता अखिल यांना लखपती केले आहे. जवळपास दोन लाख रुपये खर्च करून जोपासलेल्या या टरबूज शेतीत पाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.  

दोन लाख खर्च, साडेचार लाख कमाई 

अखिल पटेल यांनी पावणे तीन एकर शेती नीटनेटकी करून मल्चिंग, ठिबक, सेंद्रिय खते त्याचप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर करीत टरबूज शेती जोपासली. एकूण २ लाख रुपये त्यासाठी खर्च केले. १० जानेवारीला रोपे लावली. २० मार्चला पहिली तोड करण्यात आली. या पिकातून साडेचार लाखांची कमाई आतापर्यंत झाली असून आणखी दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळेल.

कोलकाता, सुरतला गेले टरबूज 

माल दलालामार्फत कोलकाता व सुरत शहरात विक्रीसाठी पाठवला गेला आहे. होलसेल दरात ८ ते १० रुपये प्रति किलो भाव मिळाला असून ६० टन टरबुजाचे उत्पन्न दोन महिन्यात शेख अखिल पटेल यांना मिळाले आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड