शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:37 IST

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली चालू असलेला सावळागोंधळ जि. प. सदस्यांनी पटलावर आणला.

ठळक मुद्देबीड जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक : पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचा मुद्दा

बीड : जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली चालू असलेला सावळागोंधळ जि. प. सदस्यांनी पटलावर आणला. जेथे गरज आहे, तेथेच निधीचा खर्च होईल. नाही तर सदर निधी शासनाकडे परत पाठवणार असल्याची भूमिका मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी मांडली.सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी पाणी पुरवठा देखभाल दुरुस्तीसाठी आलेला निधी अंदाजपत्रक करुन खर्च करणे आवश्यक असल्याचा मुद्दा मांडला. दुरुस्तीच्या नावावर चाललेला सावळा गोंधळ त्यांनी निदर्शनास आणून दिला. कोणत्या दुरुस्तीसाठी निधी आला आहे, त्याची खरंच गरज आहे का? याबाबत तपासणीची गरज असल्याचे ते म्हणाले. यावर सीईओ येडगे यांनी ज्या गावांना निधी आला तेथे पाहणी करुन नियमानुसार मंजुरी दिली जाईल. तसेच गरज असेल तर निधी खर्च करण्यात येईल. गरज नसेल तर आलेला निधी शासनाकडे पाठविणार असल्याचे सीईओ अमोल येडगे यांनी स्पष्ट केले.७६५ गावांसाठी मागविला निधीपाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडून निधी मागविला जातो.मिळालेल्या माहितीनुसार ७६५ गावांतील पाणी पुरवठा योजना देखभाल, दुरुस्तीसाठी हा निधी मागविण्यात आला.हा आकडा ४ कोटी रुपयांच्या घरात आहे.घरकुल प्रस्ताव एकाचा, मंजुरी दुसऱ्याचागटविकास अधिकाऱ्यांमार्फत घरकुलांच्या आलेल्या प्रस्तावांपैकी ठराविक प्रस्तावांनाच समाज कल्याण विभागाकडून मंजुरी देण्याचा प्रकार घडल्याची तक्रार यावेळी जि. प. सदस्य अशोक लोढा यांनी केली.बीड तालुक्यातील रौळसगाव येथे दोन घरकुल मंजूर होते. मात्र ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावानुसार निवड केलेली नव्हती. ठराव एकाचा घरकुल दुसºयाला देण्याचा प्रकार घडला. त्यात निवडलेला लाभार्थी त्या गावचा रहिवासी नसल्याचे सांगण्यात आले.बीड तालुक्यातील बाळापूर येथील ग्रामपंचायतने दिलेल्या ठरावाव्यतिरिक्त घरकुलांचे प्रस्ताव मंजूर झाल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. याबाबत चौकशी केली जाईल, असे सीईओ येडगे यांनी सांगितले.यावेळी जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, संतोष हंगे, स्थायी समिती सदस्य अशोक लोढा, अविनाश मोरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदwater shortageपाणीटंचाई