शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

द्वारकादास लोहिया यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 00:23 IST

येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायाने साश्रू नयनांनी ‘बाबूजी अमर रहे’ च्या घोषणा देत अखेरचा निरोप दिला.

ठळक मुद्देसंघर्षाची तोफ थंडावली : इच्छेनुसार करण्यात आला दफनविधी

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील ज्येष्ठ समाजसेवक तथा मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास शालिग्राम लोहिया यांच्या पार्थिवाचा त्यांच्या इच्छेनुसार शनिवारी दुपारी अंबाजोगाई येथील मानवलोकच्या प्रांगणात दफनविधी करण्यात आला. यावेळी अनेकांना हुंदके आवरता आले नाहीत. उपस्थित जनसमुदायाने साश्रू नयनांनी ‘बाबूजी अमर रहे’ च्या घोषणा देत अखेरचा निरोप दिला.डॉ. द्वारकादास लोहिया यांचे शुक्रवारी रात्री १०.४५ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ही वार्ता धडकताच अंबाजोगाई शहर व परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांची अंत्ययात्रा विद्याकुंज कॉलनी परिसरातील निवासस्थानापासून फुलांनी सजवलेल्या वैकुंठ रथातून निघाली. ही अंत्ययात्रा शिवाजी चौक, गुरुवार पेठ, मंडीबाजार, मंगळवारपेठ, बसस्थानक, प्रशांत नगर, सायगाव नाका मार्गे मानवलोकच्या प्रांगणात पोहोचली. ठिकठिकाणी डॉ. लोहिया यांना पुष्पांजली अर्पण करण्यात आली. अंबाजोगाई शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी आपले व्यवहार बंद ठेवले होते. मानवलोकच्या परिसरातही अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. डॉ. लोहिया यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचा दफनविधी करण्यात आला. याप्रसंगी लोहिया परिवारासह नातेवाईक, मानवलोकचे जुने कार्यकर्ते व राष्ट्रसेवादलाचे कार्यकर्ते, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, परळीचे तहसीलदार शरद झाडके, आ. संगीता ठोंबरे, बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, माजी मंत्री पंडितराव दौंड, माजी आ. उषा दराडे, माजी आ. प्रा. सुनील धांडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, जि. प. चे शिक्षण सभापती राजेसाहेब देशमुख, डॉ. अंजली घाडगे, डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, अ‍ॅड. अनंतराव जगतकर यांच्यासह विविध स्तरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘पिंपळाचे झाड लावा’डॉ. द्वारकादास लोहिया यांनी आपल्या मृत्यूनंतर माझ्यावर अग्निसंस्कार न करता मातीशी समरस होण्यासाठी दफनविधी करावा व दफनविधी झाला त्या ठिकाणी पिंपळाचे झाड लावावे. असा मनोदय आपल्या कुटुंबियांकडे व्यक्त केला होता. त्यांच्या या अंतिम इच्छेनुसार त्यांचा दफन विधी करण्यात आला.कुटुंबातील मुलींनीही दिला खांदाडॉ. लोहिया यांचे पार्थिव मानवलोकच्या प्रांगणात आल्यानंतर उपस्थितांसोबत त्यांच्या परिवारातील मुली, सुना व नाती अशा सर्व महिला सदस्यांनी डॉ. लोहिया यांना खांदा देत स्त्री-पुरुष समानतेची त्यांची शिकवण अंगिकारली.

टॅग्स :BeedबीडSocialसामाजिकDeathमृत्यू