शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

ललीता साळवेंमुळे पोलीस दलात येणार नवीन नियम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:57 IST

लिंगबदलाची परवानगी मागणाºया बीड पोलीस दलातील ललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ललीताकडे ‘स्पेशल केस’ म्हणून पाहिले जात आहे.

ठळक मुद्देखात्यांतर्गत वैद्यकीय तपासणीचे अधीक्षकांना आदेश

सोमनाथ खताळबीड : लिंगबदलाची परवानगी मागणाºया बीड पोलीस दलातील ललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. तपासणीत त्या शस्त्रक्रियेसाठी पात्र असल्याचे स्पष्ट झाल्यास पोलीस दलात नवीन तसेच सुधारित नियमांची निर्मिती करावी लागणार आहे. आस्थापनेच्या दृष्टीने गृह विभागाला ते करावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ललीताकडे ‘स्पेशल केस’ म्हणून पाहिले जात आहे.

ललीता या माजलगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. उत्कृष्ट धावपटू म्हणून त्यांची राष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. त्यांनी लिंगबदल करण्यासाठी रजेचा अर्ज पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे केला होता. अधीक्षकांनी हा अर्ज पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला. तेथून महासंचालकांकडे गेला. महासंचालक माथूर यांनी हा अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर साळवे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने मॅटमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता. ललीता यांना लिंग बदल झाल्यानंतर पोलीस खात्यात पुरूष म्हणून कायम रहायचे आहे. परंतु असा नियम पोलीस विभागात नाही. त्यामुळे पोलीस अडचणीत सापडले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याचे आदेश महासंचालकांना दिले होते. त्यानुसार महासंचालक माथूर यांनी अधीक्षक जी.श्रीधर यांना एक पत्र पाठवून साळवे यांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे उपअधीक्षक सावंत (गृह) हे मुंबईच्या जे.जे.रूग्णालयात गेले असून ४ डिसेंबर रोजी तिची तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला आहे. या तपासणीत तिला किती वर्षांपासून हार्मोन्सचा बदल जाणवत आहे. ती शस्त्रक्रियेसाठी सक्षम आहे का? याबाबत अभिप्राय मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.

अधीक्षकांची भेटलिंग बदलासाठी ललीता या मुंबईत मुक्कामी होत्या. मंगळवारी त्या बीडमध्ये आल्या असून त्यांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भेटही घेतली आहे. वैद्यकीय तपासणी करण्यासंदर्भात तिला पुन्हा मुंबईला जावे लागणार असल्याचे अधीक्षकांनी सांगितले आहे. साळवे यांचा भ्रमणध्वनी बंद आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांकडेही चौकशी करून बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु आपल्याकडे त्या आल्या नसल्याचे सांगण्यात आले.

निर्णय वरिष्ठांच्या हातीललीता साळवे यांच्या वैद्यकीय तपासणीचे आदेश मिळाले आहेत. ४ डिसेंबरला तपासणी केली जाईल. ही पहिलीच केस असल्याने आम्ही तिच्याकडे विशेष लक्ष देत आहोत. लिंग बदलानंतर तिला सेवेत कायम ठेवण्यासंदर्भात अद्यापतरी नियम नाही. बाकी निर्णय वरिष्ठांच्या हाती आहेत.- जी.श्रीधरपोलीस अधीक्षक, बीड