शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला मालिकावीरचा पुरस्कार
4
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
5
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
6
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
7
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
8
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
9
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
10
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
11
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
12
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
13
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
14
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
15
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
16
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
17
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
18
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
19
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
20
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'

कपिलधार यात्रेमध्ये ६० दिंड्यांसह लाखो भाविक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 00:03 IST

तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘मन्मथ माऊली, गुरूराज माऊली’ असा जयघोष यावेळी भक्त करीत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रा भरते. श्री संत शिरोमणी मन्मनस्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविक आले आहेत. तसेच ६० दिंंड्यासह लाखो भाविकांनी गुरूवारी सायंकाळपर्यंत शांततेत दर्शन घेतले. ‘हर-हर महादेव’, ‘मन्मथ माऊली, गुरूराज माऊली’ असा जयघोष यावेळी भक्त करीत होते.कपीलधार येथे श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराजांची समाधी आहे. प्रत्येक वर्षी कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. बुधवारपासून या यात्रेस सुरूवात झाली आहे. बुधवारी ५५ दिंड्यांचे आगमन झाले होते. गुरूवारी दुपारी सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा, डॉ.सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज वसमत आणि सर्वात मोठी ६४ वर्षांची परंपरा असलेल्या डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या दिंडीचे आगमन कपीलधारमध्ये झाले.मन्मथ स्वामींचा जयघोष करीत सर्व भाविकांनी शांततेत रांगा लावून समाधीस्थळाचे दर्शन घेतले. मागील चार दिवसांपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी राहिलेल्या दिंड्या येतील, असेही विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले. काही भाविक दर्शन करून परतीला निघाल्याचेही दिसून आले. दरम्यान, हुमनाबादचे आमदार हनुमंत शिंदे यांनीही एका दिंडीत सहभाग नोंदवून दर्शन घेतले.ट्रस्टचे अध्यक्ष वैजनाथअप्पा मिटकरी, उपाध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, सचिव अ‍ॅड.शांतीवीर चौधरी, नागेश मिटकरी, शिवशंकर भुरे, अशोक शहागडकर, भारत शेकडे आदी या यात्रेवर नजर ठेवून आहेत. तसेच आढावा घेत आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत दिंड्यांचे आगमन सुरुच होते.५० हून अधिक दिंड्यांचा सोहळाडॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली चाकूर ते कपिलधार दिंडीत इतर ४० दिंड्यांचा सहभाग होता. डॉ. सिद्धलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर यांच्या नेतृत्वाखाली परळी ते कपलिधार दिंडी सोहळा २५ वर्षांपासून सुरु आहे. नागापूर ते कपिलधार दिंडी शंभूलिंग शिवाचार्य महाराज मठ संस्थान अंबाजोगाई येथून आली. वसमत ते कपिलधार दिंडी करबसव शिवाचार्य महाराज धाकट्या मठाची दिंडी, भगवान शंकर अप्पा वाघमारे यांची सेलू ते कपिलधार दिंडी, महादेव शिवाचार्य महाराज मठ संस्थान कळमनुरी ते कपिलधार दिंडी, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तमलूर येथून शिवानंद शिवाचार्य महाराज तमलुरकर यांच्या नेतृत्वाखाली दिंडीचे आगमन झाले होते. शिखर शिंगणापूर ते कपिलधार दिंडी येथील नीळकंठ शिवाचार्य महाराज धारेश्वर यांच्या नेतृत्वाखाली आली होती. आंध्र प्रदेशातील बिचकुंदा येथून सोमेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या दिंडीत १० हजार भाविकांचा सहभाग होता.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम