शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर विद्यार्थिनीची वर्गबंधूकडूनच छेड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:18 IST

काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच विनयभंग केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच विनयभंग केला. त्यानंतर तिला टाँट मारल्याचा प्रकार बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी सकाळी ११ वाजता घडला. याप्रकरणी तिघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बीड शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात २२ वर्षीय तरूणी शिक्षण घेत आहे. मागील तीन वर्षापासून ती बीडमध्ये राहते. सध्या महाविद्यालयाला सुट्टया आहेत. तसेच ती महाविद्यायलाच्या वसतिगृहातच वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी ती नाश्ता करण्यासाठी जवळीलच एका हॉटेलात गेली होती. याचवेळी तेथे विलास राठोड, तानाजी सखनूर व अनिकेत सागळे हे आले. त्यांनी तरूणीला पाहून शेरे मारले. परंतु तिने याकडे दुर्लक्ष केले. हॉटेलमधून बाहेर पडतानाच विलासने तिला अडवले. ‘काय चाललंय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू...’ असे म्हणत तिचा विनयभंग केला. यावर तिने आपण प्राचार्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली. यावर त्यांनीही तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.तेथून कशीबशी सुटका करून पीडिता वसतिगृहात आली. आपल्या मामेभावाला हा प्रकार सांगितला. त्यांनी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले आणि घडला प्रकार कथन केला.त्याप्रमाणे तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पैकी विलास व तानाजी यांना पोलिसांनी अटक केली असून अनिकेत हा अद्यापही फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.सदरील तिन्ही तरूण हे या डॉक्टरची मागील चार ते पाच महिन्यांपासून छेड काढत होेते. वर्गात बसल्यावरही शेरे मारत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.आपले शिक्षण बंद होईल, उगाच अडचण नको, म्हणून सदरील पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही.सोमवारी त्यांनी जास्तच केल्याने पीडितेने ठाणे गाठून फिर्याद दिली. केवळ भितीपोटी आपण शांत बसल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :Molestationविनयभंगdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी