Kshirsagar supporters dazzle across the district | क्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष
क्षीरसागर समर्थकांचा जिल्हाभरात जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळातजयदत्त क्षीरसागर यांची वर्णी लागल्याबद्दल रविवारी शपथविधीनंतर जिल्हाभरात फटाके फोडून, पेढे वाटून समर्थकांनी जल्लोष केला.
बीड शहरात नगर रोड, सुभाष रोड, डीपी रोड, बशीर गंज, पेठ बीडसह विविध भागात क्षीरसागर समर्थकांनी तसेच शिवसैनिकांनी फटाके वाजवून जल्लोष केला. माजलगाव येथे नगराध्यक्ष सहाल चाऊस, माजी नगराध्यक्ष अशोक होके पाटील, नितीन मुंदडा, सुधिर नागापुरे यांच्या उपस्थितीत रविवारी श्हरात विविध ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटुन आंनद साजरा करण्यात आला. यावेळी तुकाराम येवले, मन्मथअप्पा लांडगे, शिवाजी डुकरे, सुंदर डिग्रसकर, संतोष वाघमारे, विक्रम शिंदे, संतोष गायगवे, भैय्या गवारे, मुकूंद सातफळकर, सिध्देश्वर शिंदे, कृष्णा कानडे, गोविंद देशमाने, गणेश शिंदे, सुरज एखंडे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
धारुरमध्ये माजी नगराध्यक्ष शेषेराव फावडे दिनेशसिंह हजारी शिवसेनेचे विनायक ढगे बाळासाहेब कुंरूंद बंडोबा शिनगारे राजकूमार शेटे यशवंत गायके अजय सोनटक्के शामसूंदर तिडके कृष्णा सोनटक्के आदींसह शिवसैनिक व जयदत्त क्षिरसागर समर्थकांनी फटाके वाजवून आंनद साजरा केला.
बीड तालुक्यातील नांदुर फाटा येथे त्यांच्या निवडीचे स्वागत पेढे वाटून व २१ तोफांची सलामी देऊन करण्यात आले यावेळी काकडे नानासाहेब पाटील्, अर्जुनराव भोसले, राजाभाऊ शेळके, अर्जुनराव तांदळे, पिंटु तांदळे, डिगांबर भोसले, शिवराज भोसले,गुलाबराव शेळके, दिनकर ताटे आदी उपस्थित होते.


Web Title: Kshirsagar supporters dazzle across the district
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.