शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत क्रांतिदिनी शेतकरी कामगार पक्षाचा बैलगाडी मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 19:57 IST

बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन निघाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची, कामगारांची होत असणारी  पिळवणूक, अडवणूक थांबली पाहिजे. वयोवृध्द शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करा.

अंबाजोगाई : शेतकरी व कामगार यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने सोमवारी दुपारी बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चेकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांना दिले. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक दोन तास विस्कळीत झाली होती.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली हा  बैलगाडी मोर्चा अंबाजोगाई शहरातील अण्णाभाऊ साठे चौकातुन निघाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सावरकर चौक,शिवाजी चौक मार्गे मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. शहरातून निघालेल्या या मोर्चामुळे दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. या मोर्चात भाई मोहन गुंड, अॅड नारायण गोले पाटील, अॅड संग्राम तुपे ,भिमराव कुटे, भाई वजीर शेख, नवनाथ जाधव, बाळु तरकसे,अशोक रोडे ,अमोल सांवत यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या :  शेतकऱ्यांची, कामगारांची होत असणारी  पिळवणूक, अडवणूक थांबली पाहिजे. मागील वर्षाचा पिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करा. केंद्र सरकारने नव्याने पारीत केलेले  तिनही कृर्षी कायदे तात्काळ रद्द करा. बँकेकडून शेतकऱ्याची पीक कर्जासाठी अडवणूक तात्काळ थांबवा. डिझेल पेट्रोल गॅस महागाई तात्काळ कमी करा.  आंबासाखर सहकारी कारखान्यांच्या २०२०-२०२१ हंगाम ऊस गाळापाची उर्वरीत रक्कम एक रकमी द्यावी. हमाली करणाऱ्या असंघटित कामगारांचा माथाडी कामगारांच्या योजनेचा लाभ द्या. अतिवृष्टी झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्याना नुकसान भरपाई द्या. आंबेजोगाई तालुक्यातील संजय गांधी निराधारांचे  मानधन प्रत्येक महिन्याला वाटप करा.वयोवृध्द शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून थकित नसलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये द्या. आंबेजोगाई शहरातील पाले- भाजी विक्रेते शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊन कोरोनाच्या काळात त्यांच्याकडुन कुठल्याही शुल्काची नगरपालिकेने  आकारणी करू नये. आदी मागण्या मांडण्यात आल्या.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड