शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी; तायक्वांदोमुळे  जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 18:34 IST

जागतिक तायक्वांदो दिवस : जिल्हाभर ५ हजारपेक्षा जास्त मुले घेताहेत धडे; बीडच्या खेळाडूंची एक ‘किक’ प्रतिस्पर्ध्याला भरवते धडकी

ठळक मुद्देजिल्हाभरात ५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी याचे प्रशिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५ राज्यस्तरीय स्पर्धातायक्वांदो खेळाच्या आरक्षणावर जिल्ह्यातील २८ खेळाडू आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

- सोमनाथ खताळ 

बीड : तायक्वांदो या खेळाबद्दल पूर्वी लोक अनभिज्ञ होते, हाच खेळ आता लोकप्रिय बनला आहे. जिल्हाभरात ५ हजारापेक्षा जास्त विद्यार्थी याचे प्रशिक्षण घेत आहेत. एवढेच नव्हे तर बीडच्या खेळाडूंनी जिद्द व अथक परिश्रमाच्या बळावर बीड जिल्ह्याचे नाव देश पातळीवर झळकावले आहे. बीडच्या चार खेळाडूंनी भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. जागतिक तायक्वांदो दिवसाच्या निमित्ताने घेतलेला हा आढावा.

जागतिक तायक्वांदो फेडरेशनने ४ सप्टेंबर १९७२ साली तायक्वांदो या खेळाला सुरूवात झाली. त्यानंतर बीडमध्ये २० मे १९९४ रोजी हा खेळ सुरू झाला. सुरूवातीला या खेळाबद्दल कोणालाच माहिती नव्हती. सर्वजण या खेळापासून दुर पळत होते. परंतु जिल्ह्यातील प्रशिक्षकांची जिद्द आणि खेळाडूंच्या मेहनतीमुळे आज या खेळाने प्रत्येकाच्या मनात घर केले आहे. आता या खेळाला इतर खेळांप्रमाणेच मान्यता मिळाली असून नौकरी, शिक्षण व इतर ठिकाणी इतर खेळांप्रमाणेच गुण दिले जात आहेत.

सध्या बीडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत. शालेय स्तरावरही याचे प्रशिक्षण दिले जाते. पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थी आज याचे प्रशिक्षण घेत आहेत. हाच धागा पकडून मागील काही वर्षांमध्ये जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धाही बीडच्या खेळाडूंनी गाजविल्या. सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांची लयलूट करून राज्यात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले. राज्यात इतर ठिकाणी झालेल्या स्पर्धांमध्येही बीडने बाजी मारलेली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ५ राज्यस्तरीय स्पर्धाबीड जिल्हा क्रीडा संकुलावर शासन व तायक्वांदो असोसिएशनतर्फे आतापर्यंत पाच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच येथे निवड चाचणी घेण्यात आली. बीडमध्ये निवडलेल्या खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करून बक्षिसे खेचून आणली.

कॉमनवेल्थमध्ये मिळवले पदक जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये जिद्द व चिकाटी असून आपण कशातच कमी नसल्याचे दाखवून दिले आहे. ज्या खेळाबद्दल माहिती नव्हती त्याच खेळात यश संपादन करून जिल्ह्याचे नाव देशात झळकविण्यात चार खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली. यामध्ये दीक्षा बनकर, अविनाश पांचाळ, प्रियंका ढाकणे, शुभम बनकर यांचा समावेश आहे. दीक्षाने कॉमनवेल्थ या अंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. तसेच १५० पेक्षा जास्त खेळाडूंनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले आहे.

७ खेळाडूंना शिष्यवृत्तीतायक्वांदोमुळे ७ खेळाडूंना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. मंगळवारी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर माजी नगराध्यक्षा तथा प्राचार्या डॉ.दीपा क्षीरसागर यांच्या हस्ते ही शिष्यवृत्त खेळाडूंना दिली जाणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

२८ खेळाडू शासकीय सेवेततायक्वांदो खेळाच्या आरक्षणावर जिल्ह्यातील २८ खेळाडू आज शासकीय सेवेत कार्यरत आहेत. पोलीस, शिक्षण, आरोग्य, विद्यूत आदी विभागांचा समावेश आहे.

१५ खेळाडूंना उत्कृष्ट क्रीडापटू पुरस्कारमहाराष्ट्र शासनाच्यावतीने दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडापटू हा पुरस्कार तायक्वांदो खेळाडू असलेल्या १५ जणांना मिळाला आहे. स्वातंत्र्य दिनी याचे जिल्हाधिकारी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आलेले आहे. पदकाप्रमाणे त्यांच्या बक्षिसाचे स्वरूप होते.

खेळाडूंचा अभिमान आहेप्रत्येक खेळाडू चांगला कसा घडविता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतात. बीडच्या खेळाडूंमधील जिद्द पाहून आनंद होतो. देशपातळीवर बीडचे नाव पोहचल्याने मला खेळाडूंचा अभिमान आहे. दर्जेदार स्पर्धा, प्रशिक्षण केंद्र व सुविधा देण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून नेहमी प्रयत्न करेल. - अविनाश बारगजे, राष्ट्रीय प्रशिक्षक तथा अध्यक्ष, तायक्वांदो असो. आॅफ बीड जिल्हा

टॅग्स :BeedबीडState Governmentराज्य सरकारGovernmentसरकारStudentविद्यार्थी