शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने कडेकोट सुरक्षा व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:17 IST

महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : महाराष्ट्राचे शक्तीपीठ व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री योगेश्वरी देवीचा दसरा महोत्सव २९ सप्टेंबर ते ८ आॅक्टोबर या कालावधीत संपन्न होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिर सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रशासनाच्या वतीने ठोस उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.८ वर्षापूर्वी योगेश्वरी देवीच्या अंगावरील दागिन्यांची झालेली चोरीवरून महाराष्ट्रात उठलेले वादळ तसेच दागिन्यांच्या तपासाबाबत अजूनही असलेली संभ्रमावस्था. अशा घटना पुन्हा घडू नयेत याची खबरदारी घेत यावर्षी दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था आखण्यात आली आहे. मंदिर परिसरात १५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. तसेच पोलिस बंदोबस्तासाठी ६० पोलिस तीन अधिकारी यांची विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. तसेच प्रवेशद्वारात सुरक्षेसाठी दोन धातूशोधक यंत्र बसविले आहेत. चिडीमार पथक, आरोग्यसुविधा देणारी पथके महोत्सवाच्या निमित्ताने स्थापन केली आहेत. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोेर, पो.नि. सिद्धार्थ गाडे, तहसीलदार तथा योगेश्वरी देवल कमिटीचे अध्यक्ष संतोष रूईकर, सचिव भगवानराव शिंदे, विश्वस्त कमलाकर चौसाळकर, गिरीधारीलाल भराडिया, उल्हास पांडे, प्रा. अशोक लोमटे, पूजा कुलकर्णी, पृथ्वीराज साठे, अ‍ॅड. शरद लोमटे, मुख्य पुजारी सारंग पुजारी, यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मंदिर परिसरातील स्वच्छता व विविध सोयीसुविधा भक्तांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे तहसीलदार संतोष रूईकर म्हणाले. तसेच दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. दर्शनासाठी स्वतंत्र रांगा तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी स्वच्छता पथक नेमण्यात आले आहेत. भाविकांना सर्व सेवा व सुविधा देवल कमिटीच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

टॅग्स :Navratriनवरात्रीReligious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम