शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या 500 रुपयांत केले कामाचे जुगाड, आठवीतील पोराने केली आयडियाची शाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2023 07:46 IST

प्रतीक पठाडे याने शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ यूनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी ‘ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे.

- नितीन कांबळे कडा (जि. बीड)  : तालुक्यातील आष्टा (हरिनारायण) येथील  पाचशेहून अधिक पटसंख्येच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत  इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रतीक विलास पठाडे या विद्यार्थ्याने आपल्या कल्पक बुद्धीने विविध सेन्सर्सचा वापर करून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी काठी तयार करून आकाशाला गवसणी घातली आहे.   

प्रतीक पठाडे याने शाळेत ज्ञानाचे धडे गिरवत असतानाच, आरडीओ यूनो व अल्ट्रा सोनिक सेन्सरच्या माध्यमातून अंध व्यक्तींसाठी वरदान ठरणारी ‘ब्लाइंड स्टिक’ तयार केली आहे. रस्त्याने चालताना एखाद्या अंध व्यक्तीला रस्ता पार करायचा असेल, अन् समोरून काही अडथळा आल्यास या स्टिक यंत्राची आपोआप घंटा वाजते. होणाऱ्या आवाजाने त्या अंध व्यक्तीसमोर येणारा कसलाही अडथळा एका क्षणात त्याच्या लक्षात येऊ शकतो. या विद्यार्थ्याचा हा आगळावेगळा प्रयोग शाळेचा नावलौकिक वाढवणारा ठरला आहे. प्रतीक हा  शिष्यवृत्तीपात्र व उत्कृष्ट कबड्डीपटूदेखील आहे. या प्रयोगासाठी मुख्याध्यापक मच्छिंद्रनाथ जगताप, विज्ञान शिक्षक नामदेव भिसे, धर्मनाथ शिंदे व इतरांचे त्याला मार्गदर्शन लाभले. गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव यांनीही प्रतीकच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.   

सहा दिवसांत साकारली काठी  सेन्सर, बझर, प्लॅस्टिक पाइप, वायर हे साहित्य घेऊन सहा दिवसांच्या मेहनतीनंतर प्रतीकने अवघ्या ५०० रुपयात ही काठी बनवली आहे. प्रतिकूल परिस्थितीतील हा विद्यार्थी भविष्यात मोठे नाव करील, असा विश्वास शिक्षक धर्मनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

आमची शाळा शिक्षकांसाठी ज्ञानमंदिर असून, विद्यार्थी हेच दैवत समजून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता व आत्मविश्वास वाढावा, म्हणून शाळेचे सर्व शिक्षक प्रयत्नशील असतात. - मच्छिंद्रनाथ जगताप, मुख्याध्यापक, जि. प. शाळा आष्टा (ह.ना.)

टॅग्स :Beedबीड