शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
2
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
3
"ओबीसींना आडवे येणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा, विजय वडेट्टीवार भूमिका स्पष्ट करा"; भुजबळ यांचे ओबीसी एल्गार सभेत आवाहन
4
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
5
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
6
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
7
गुजरातमध्ये नव्या मंत्रिमंडळात आता २६ मंत्री; १९ नवे चेहरे; नव्या मंत्र्यांचा शपथविधी; आठ मंत्री पटेल समाजाचे
8
Manoj Jarange: "ही ओबीसीची सभा नसून..." बीडमधील महाएल्गार सभेवर मनोज जरांगेंची टीका
9
Goa Cylinder Blast: दक्षिण गोव्यातील विजय मरीनमध्ये सिलेंडरचा स्फोट; २ ठार, ५ जखमी
10
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
11
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
12
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
13
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
14
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
15
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
16
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
17
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
18
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
19
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
20
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 

ऐन दिवाळीत जाणार ५९७ नर्सेसची नोकरी, सेवा समाप्तीचे सहसंचालकांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 10:04 IST

प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात नाकारली मंजुरी

सोमनाथ खताळ/ अविनाश साबापुरे   बीड/यवतमाळ : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजुरी नाकारल्याने राज्यातील ५९७ परिचारिकांची सेवा समाप्त केली जाणार आहे. याबाबत राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. दिवाळी गोड होणार, या आशेवर बसलेल्या परिचारिकांची सेवा समाप्त करून आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वीच  हिरावून घेतला आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अंमलबजावणी आराखड्यामध्ये नर्सिंग कार्यक्रमासाठी बिगर आदिवासी क्षेत्राकरिता ३ हजार २०७ पदांची मंजुरी केंद्र शासनाकडे प्रस्तावित केली होती; परंतु यातील २ हजार ६१० पदांनाच मंजुरी दिली असून, इतर ५९७ पदांना नामंजुरी दिली आहे. त्यामुळे या सर्व परिचारिकांची सेवा तत्काळ समाप्त करावी, असे पत्र सहसंचालक डॉ. कंदेवाड यांनी राज्यातील सर्वच सीईओंना काढले आहे. 

या तीन मुद्द्यांवरून होणार कमीमागील वर्षभरात एकही बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील परिचारिकांची पदे रद्द करावीत, ज्यांचे काम असमाधानकारक आहे, अशांना कमी करावे, ज्यांची सेवा कमी झालेली आहे (सेवा ज्येष्ठतेनुसार) त्यांना कमी करावे, असे पत्रात म्हटले आहे. 

जिल्हानिहाय आकडेवारीठाणे ३, रायगड २१, पालघर १, नाशिक १९, धुळे १०, जळगाव १९, अहमदनगर २९, पुणे १६, सोलापूर ३९, सातारा २९, कोल्हापूर ३९, सांगली २३, सिंधुदुर्ग २१, रत्नागिरी १९, औरंगाबाद ८, जालना १०, परभणी १९, हिंगोली १२, लातूर २२, उस्मानाबाद १६, बीड ३०, नांदेड ३७, अकोला १३, अमरावती १९, बुलडाणा २४, वाशिम ९, यवतमाळ २१, नागपूर २४, वर्धा २२, भंडारा ११, चंद्रपूर ११ याप्रमाणे जिल्हानिहाय परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. 

मागील वर्षीही सेवा समाप्तमागील वर्षीही एवढ्याच परिचारिकांची सेवा समाप्त करण्यात आली होती. अनेक जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी त्यांना कार्यमुक्तही केले होते; परंतु अचानक रात्रीच्या सुमारास आदेश बदलून त्यांची सेवा समाप्त करू नये, असे सांगण्यात आले होते. आता पुन्हा अशाच प्रकारे आदेश निघेल आणि सेवा टिकून राहील, अशी अपेक्षा या ५९७ परिचारिकांना लागली आहे.  

ही पदे आरोग्य सेवेकरिता अत्यंत महत्त्वाची आहेत. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून काही अधिकारी जाणीवपूर्वक या परिचारिकांच्या जीवावर उठले आहेत. अशोक जयसिंगपुरे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटना.

टॅग्स :jobनोकरी