शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
3
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
4
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
5
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
6
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
7
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
8
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
9
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
10
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
11
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
12
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
13
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
14
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
15
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
16
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
17
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
18
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे चिखलफेक करणे नव्हे : कोर्ट
19
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 
20
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!

ऊस गाळपात जयमहेश कारखाना मराठवाड्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:34 IST

रांजणी कारखाना दुसऱ्या स्थानी : साखर उताऱ्यात पूर्णा कारखाना आघाडीवर पुरूषोत्तम करवा माजलगाव (जि. बीड) : मागील ...

रांजणी कारखाना दुसऱ्या स्थानी : साखर उताऱ्यात पूर्णा कारखाना आघाडीवर

पुरूषोत्तम करवा

माजलगाव (जि. बीड) : मागील तीन महिन्यांपासून मराठवाड्यातील १४ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख मे.टन उसाचे गाळप करत माजलगाव तालुक्यातील जयमहेश शुगर अव्वल स्थानी राहिला, तर रांजणी येथील नॅचरल शुगर कारखाना साडेचार लाख मे. टन उसाचे गाळप करत दुसऱ्या स्थानी आहे. साखर उताऱ्यात मात्र वसमत येथील पूर्णा कारखाना नंबर एकवर आहे.

गतवर्षी व यावेळी चांगला पाऊस पडल्याने उसाची मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली. माजलगाव तालुक्यातील एक खासगी व दोन सहकारी साखर कारखान्यांनी मागील तीन महिन्यांपासून जोरदार गाळप सुरू केले. पवारवाडी येथील जयमहेश शुगर या खासगी कारखान्यात रोज ४ हजार ५०० मे.टन ऐवढे गाळप होत आहे. २२ जानेवारीपर्यंत ४ लाख ६८ हजार ५३० मे.टन गाळप करत मराठवाड्यातील १४ कारखान्यांत सर्वांत जास्त उसाचे गाळप करणारा हा कारखाना ठरला. रांजणी येथील नॅचरल कारखान्याना ४ लाख ५७ हजार ४३० मे.टन उसाचे गाळप करत दुसऱ्या स्थानी राहिला. तेलगाव येथील लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना ३ लाख ९३ हजार ६०० मे.टन उसाचे गाळप करत तिसऱ्या स्थानी राहिला.

साखर उताऱ्यात पूर्णा आघाडीवर

मराठवाड्यातील १४ कारखान्यांपैकी वसमत येथील पूर्णा कारखान्याचा साखर उतारा हा सर्वांत जास्त १०.५५ एवढा आहे. त्याखालोखाल नांदेड येथील बळीराजा कारखान्याचा साखर उतारा १०.३२ व बागेश्वरी येथील श्रद्धा कारखान्याचा साखर उतारा १०.१२ आहे.

मराठवाड्यातील कारखान्यांचे गाळप

समर्थ कारखाना (महाकाळा) ३ लाख ७८ हजार ६३० मे.टन , बळीराजा (नांदेड) ३ लाख ३५ हजार ७०० मे.टन , येडेश्वरी (सारणी) ३ लाख २१ हजार ३७० मे.टन, ट्वेन्टी वन शुगर (सायखेडा) २ लाख ७७ हजार ३५५ मे.टन ,श्रद्धा (बागेश्वरी) २ लाख ५२ हजार १० मे.टन , जयभवानी(गढी ) २ लाख ३५ हजार ५८१ मे.टन , सागर (तीर्थपुरी) २ लाख ३० हजार ७०० मे.टन , पूर्णा (वसमत) २ लाख २७ हजार ४१० मे.टन , भाऊराव (नांदेड) २ लाख १४ हजार ९८० मे.टन, छत्रपती (सावरगाव) १ लाख ७९ हजार ९१० मे.टन, योगेश्वरी (लिंबा) १ लाख ३६ हजार ७२७ मे. टन.

११ लाख यन गाळपाचे उद्दिष्ट

माजलगाव तालुक्यातील शेतकरी ,कारखान्याचे कर्मचारी , ऊसतोड कामगारांच्या सहकार्यामुळे गाळप चांगल्यापद्धतीने सुरू असल्याने हे शक्य झाले आहे. यावर्षी आमचे ११ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट आहे.

-- गिरीश लोखंडे , उपाध्यक्ष, जयमहेश शुगर, पवारवाडी, ता. माजलगाव