शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जय महेश कारखान्याच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 23:05 IST

शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देखंडपीठ : जीवनावश्यक वस्तू कायदा कलमानुसार कारवाई करा

बीड : शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला दिलेल्या उसापोटी किफायतशीर दराने द्यावयाची रक्कम उशिराने दिल्या प्रकरणात माजलगाव येथील जय महेश साखर कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार गुन्हा दाखल करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. टी. व्ही. नलावडे आणि न्या. एम. जी. सेवलीकर यांनी दिला आहे.यासंदर्भात बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील तालखेड येथील शेतकरी पवन रामकिसन चांडक यांनी याचिका दाखल केली होती की, जय महेश शुगर लिमिटेड, पवारवाडी यांनी फेब्रुवारी आणि मार्च २०१९ मध्ये त्यांचा ऊस गाळपासाठी नेला. ऊस नियंत्रण आदेश १९६६ नुसार साखर कारखान्याने शेतकºयाचा ऊस गाळपासाठी नेल्यानंतर १४ दिवसांत त्याचा मोबदला दिला पाहिजे. १४ दिवसांत मोबदला देऊ न शकल्यास किंवा मोबदला देण्यास विलंब झाल्यास, शेतकºयाला देय मोबदल्यावर दरसाल दर शेकडा १५ टक्के दराने व्याज मिळायला हवे.जय महेश कारखान्याने याचिकाकर्ता आणि इतर शेतकऱ्यांना उसाचा मोबदला मुदतीत दिला नाही. कारखान्याचे अध्यक्ष, सर्व संचालक आणि व्यवस्थापक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून शेतकºयांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली होती. सुनावणीअंती खंडपीठाने माजलगाव (ग्रामीण) पोलिसांना वरीलप्रमाणे आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सुदर्शन साळुंके यांनी, तर शासनातर्फे एस. बी. नरवडे यांनी काम पाहिले.

टॅग्स :BeedबीडSugar factoryसाखर कारखानेAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ