शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

जय भवानी...जय शिवराय... बीडमध्ये घोषणांनी आसमंत दणाणला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:10 IST

हातात झेंडे... डोक्याला फेटे... गळ्यात रुमाल... रस्त्यांवर दुतर्फा लावलेले झेंडे... यामुळे संपूर्ण बीड शहर सोमवारी भगवेमय झाले होते. ढोल ताशा... झांज पथक़.. घोडेस्वार.. चित्तथरारक कसरती आणि फुलांच्या सजलेल्या रथातून राजे शिवछत्रपती यांच्या प्रतिमेची काढलेली लक्षवेधी मिरवणूक बीडकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. ‘जय भवानी.. जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’ अशा गगनभेदी घोषणांनी आसमंत दणाणून गेला. जिल्ह्यात सर्वत्र शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रविवारी रात्रीपासूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अभिवादनासाठी शिवप्रेमींनी गर्दी केली होती. सोमवारी रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती. ठिकठिकाणी मिरवणुका सुरूच होत्या. महिला, मुली, तरूण, नागरिकांनी दुचाकी रॅली काढून लक्ष वेधले. वेशभूषा, देखावे, शिवकालीन कलाप्रकारांमुळे यंदाच्या शिवजयंतीला आगळे महत्त्व आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरात सोमवारी सकाळीच सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी विकास माने, जि.प.सदस्य संदीप क्षीरसागर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. विजय पवार, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, माजी सभापती अमर नाईकवाडे, फारूक पटेल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला, पुरूष, युवक, युवती यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दरम्यान, सकाळी आठ वाजेपासून बीड शहरातील विविध भागातून तरूणांनी दुचाकी रॅली काढली. दुचाकीला लावलेले उंच झेंडे, डोक्याला फेटे आणि जय भवानी, जय शिवाजीचा जयघोष करीत प्रत्येक रॅली छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी चौकात येत होती. दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलांची रॅलीही येथे आली. सर्वांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर रॅली माँ जिजाऊ यांच्या पुतळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. येथे जिजाऊंना वंदन करून रॅलीचा समारोप करण्यात आला. सर्व दुचाकी रॅली शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आल्या.सराव, कलाविष्कारनियोजनाचे तीन महिने सराव करुन ११ खाजगी बस, ४ कन्टेनर, काही मिनीबसमधून बीडमध्ये आलेल्या कलाकारांनी शुक्रवारपासून ज्ञानेश्वर स्कुलच्या मैदानात पुन्हा सराव केल्यानंतर सोमवारी सार्वजनिक शिवजयंती उत्सवात बीडकरांपुढे आपला कलाविष्कार सादर केला.शिवस्तुती, रुद्रतांडव आणि कोल्हापूरनिर्मित खास करवीर नाद प्रस्तुत करत ढोलपथकाने व गोवा, ओरिसा आणि मणिपूरच्या पथकांनी कलाप्रकार सादर करत बीडकरांना जिंकले.बीडसाठी एकत्र येतात हौशीया पथकातील सर्व कलाकार हौशी आहेत. यात कोल्हापूर, कागल, पट्टणकोडोली, हुपरी, ठाणे येथील पाच पथकांचा समावेश आहे. हे कलाकार महाविद्यालयात शिक्षण घेणारे, अभियंता, वैद्यकीय, शिक्षण, उच्चशिक्षण, नवउद्योजक क्षेत्रातील होते.

तीन महिन्यांपासून नियोजनबीड येथील शिवजयंतीसाठी मागील तीन महिन्यांपासून हे पथक तयारी करत होते.पाच ठिकाणचे कलाकार समन्वय ठेवून या गावी, त्या गावी जाऊन कलाप्रकाराचा सराव करत होते.

अशी निघाली मिरवणूकदुपारी १२ वाजल्यापासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शिवजन्मोत्सव समितीच्या संयोजकांनी नियोजन केले. दुपारी ३ वाजल्यापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक, जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.

दोन पिढ्यांचा सहभागया ढोल पथकातील अवघे ६ वर्ष असलेला सर्वात लहान कोल्हापुरचा गुरुराज प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता. विशेष म्हणजे या पथकात त्याची आई निलम आणि वडील गणेश मांडवकरही सहभागी होते. सर्वांत वयस्कर ६७ वर्षांचे व्यावसायिक असलेले विजय धर्माधिकारी तरुणांनाही लाजवित होते. त्यांची कन्या जान्हवी देखील पथकात होती.

भारतात एकमेव बीड...मी नॅशनल इव्हेंट आॅर्गनाइझ करतो. मात्र, संपूर्ण भारतात बीड हे एकमेव शहर आहे, जिथे खाजगी इव्हेंट असुनही आॅल इंडियातून कलापथक निमंत्रित केले जातात, हे वैशिष्ट्य आहे. बीडच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीशी माझ्या सहा वर्षांच्या ऋणानुबंधामुळे सर्वात आधी बीडलाच आम्ही प्राधान्य देतो.

- विनोद साळोखे, समन्वयक,उत्सव इव्हेंट तथा भारतीय कलासंस्कृती अकादमीचे सचिव.