शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

घरात दम कोंडतोय! राज्यात दररोज ३२ 'वैष्णवीं'चा होतोय छळ, ग्रामीणपेक्षा शहरात अधिक घटना

By सोमनाथ खताळ | Updated: May 24, 2025 19:09 IST

ग्रामीणपेक्षा शहरांमध्ये विवाहिता छळांच्या घटना अधिक

बीड : सासरच्या छळास कंटाळून पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेने आत्महत्या केली. सासरच्या लोकांना राजकीय पार्श्वभूमी असल्याने या प्रकरणाची राज्यभरात चर्चा होत आहे, परंतु याच वैष्णवीप्रमाणे दररोज ३२ महिलांचा पती आणि सासरच्या लोकांकडून छळ होत आहे. १ जानेवारी २०२२ ते २२ मे २०२५ या १,२३७ दिवसांत राज्यात तब्बल ३९ हजार ६६५ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद झाले आहेत. चार भिंतीच्या आत विवाहितांचा दम कोंडत असल्यानेच त्या आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे अनेक घटनांवरून समोर आले आहे.

मुंबई, पुणे शहरांत जास्त छळविवाहितांचा मुंबई, पुणे या मोठ्या शहरांमध्येच जास्त छळ होत असल्याचे समाेर आले आहे. हा छळ असाह्य होताच, त्यांनी पोलिस ठाणे गाठत सासरच्यांविरोधात तक्रार दिली.

सर्वाधिक गुन्हे कोठे दाखलमोठ्या शहरांमध्येच विवाहितांचा छळ अधिक होत आहे. यात बृहन्मुंबईत सर्वाधिक ४१२, अहिल्यानगर जिल्ह्यात १९६, बीड २४३, छत्रपती संभाजीनगर २८८, धुळे १८१, जालना १८०, नागपूर १२१, नांदेड १७५, नाशिक २३७, पुणे २२९ या ठिकाणी जास्त गुन्हे दाखल आहेत. ही आकडेवारी १ जानेवारी ते २२ मे २०२५ या दरम्यानची आहे.

कोणत्या कारणांसाठी छळघर, प्लॉट, व्यवसाय, वाहन, कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये, अशा विविध कारणांसाठी विवाहितांचा चार भिंतीत सासरच्या लोकांकडून छळ केला जात आहे. काही घटनांमध्ये तर हुंडा कमी दिला होता, तो आता घेऊन ये, असे म्हणत छळ केला जात आहे.

आधी लव्ह, आता हेटआकर्षणातून तरुण, तरुणी प्रेमात पडतात. त्यानंतर, कुटुंबाला विश्वासात न घेता प्रेमविवाह करतात, परंतु काही दिवसांतच त्यांचे बिनसते. किरकोळ कारणांवरून खटके उडतात. यातून विवाहिता पोलिस ठाणे गाठत तक्रार देते. असे गुन्हेही अनेक ठाण्यात दाखल आहेत. आगोदर लव्ह आणि आता हेट, अशी अवस्था त्यांची झाली आहे.

भरोसा सेलही कमी पडतोकाही विवाहिता सासरच्यांनी छळ केल्यानंतर भरोसा सेलकडे धाव घेतात. येथे त्यांना वारंवार बोलावून घेत समुपदेशन केले जाते. काही प्रकरणांत तडजोड होते, परंतु काहींत सासरचे लोक नांदविण्यास नकार देतात. अशा वेळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होतो. भरोसा सेलही त्यांच्यापुढे हात जोडतो.

११ महिन्यांत ३,३४३ गुन्हे१ जूलै २०२४ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा छळ झाला आहे. यातील काहींच्या हाताची तर मेहंदी निघण्याआधीच त्यांचा छळ सुरू झाला होता. मागील ११ महिन्यांत छळाचे ३,३४३ गुन्हे राज्यात नोंद आहेत.

अशी आहे आकडेवारीवर्षे - गुन्हे२०२२ -११,९८२२०२३ - ११,७७०२०२४ - ११,१७७२२ मे २०२५ - ४,७३६

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदा