शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

वाळूच्या हप्त्यासाठी 'ठरलं' होतं! लाच घेताना चकलांबाचे ठाणेदार अन् कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

By सोमनाथ खताळ | Updated: March 11, 2026 00:05 IST

वाळू तस्करीला अभय देण्यासाठी दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रात्री 10 वाजता रंगेहाथ पकडले.

- सोमनाथ खताळ बीड  - वाळू तस्करीला अभय देण्यासाठी दरमहा ६० हजार रुपयांची लाच मागणारे चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी रात्री 10 वाजता रंगेहाथ पकडले. या कारवाईने बीड पोलीस दलात खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर रात्री 11 वाजता जन संपर्क अधिकारी असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन इंगळे यांच्याकडे चकलांबा पोलिस ठाण्याचा पदभार सोपविला असून रात्री 1 वाजेपर्यंत ते पदभार घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

वाळूचे वाहन बिनदिक्कत चालू देण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने ६० हजारांची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. हे पैसे घेण्यासाठी कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता. एसीबीच्या पथकाने सापळा रचून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसेला ताब्यात घेतले.

ठाणेदाराला पळताना पाठलाग करून पकडले!एकीकडे कर्मचारी ताब्यात असताना, दुसरीकडे मुख्य सूत्रधार असलेले प्रभारी अधिकारी संदीप पाटील चकलांबा पोलीस ठाण्यातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. संशय येताच एसीबीच्या पथकाने त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. पाटील यांनी पळ काढला असला तरी, एसीबीच्या धाडसी पथकाने त्यांना शिताफीने पकडले.

पोलीस दलाची लक्तरेयापूर्वी पाटोदा, माजलगाव आणि गेवराई पोलीस ठाण्यांतील कर्मचारी वाळूच्या हप्त्यांच्या प्रकरणात अडकले होते. मात्र, आता चक्क पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारीच लाच घेताना अडकल्याने पोलीस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलीस उप अधीक्षक सोपान चितमपल्ली यांच्या नेतृत्वाखालील एसीबीच्या पथकाने ही अत्यंत गोपनीय आणि धाडसी कारवाई केली आहे.

पाटील आणि सुरवसे या दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वाळू माफियांना साथ देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यातील लाचखोर पोलिसांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे. आता या प्रकरणाचा तपास किती खोलवर जातो आणि यात आणखी कोणाकोणाची नावे समोर येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 'साहेबांचा' इशारा, पण वसुलीचा सोस कायम!

एकीकडे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी सोमवारीच वार्षिक तपासणीदरम्यान भ्रष्टाचाराविरुद्ध कडक कारवाईचा इशारा दिला होता, तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनीही सुरुवातीपासूनच 'नो करप्शन'चे धोरण स्पष्ट केले होते. वरिष्ठांच्या या कडक ताकीदीची शाई वाळत नाही तोच, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप पाटील आणि त्यांच्या कर्मचाऱ्याने पुन्हा वसुलीचा मार्ग निवडल्याचे समोर आले आहे. वरिष्ठांच्या इशाऱ्याला न जुमानता, थेट पोलीस चौकीत हप्ता वसुलीचे धाडस करणे, हे पोलीस दलातील शिस्त मोडणाऱ्यांसाठी एक मोठे आव्हानच ठरले आहे. या घटनेने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशांना जिल्ह्यातील ठाणेदार किती गांभीर्याने घेतात, यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chakalamba Police caught accepting bribe for illegal sand transport.

Web Summary : Chakalamba's police inspector and staff were arrested for accepting a bribe of ₹50,000 monthly for allowing illegal sand transportation. ACB caught them red-handed after a chase. This incident raises questions about police efficiency and corruption in the Beed district despite warnings from senior officers.
टॅग्स :BeedबीडBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी