शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

१०१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेत अनियमितता; बीडमध्ये जलजीवनचे ९४ ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये

By अनिल भंडारी | Updated: February 3, 2025 16:57 IST

जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाचा कालबद्ध कार्यक्रम तसेच मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यक्रमातंर्गत विहित कालावधीत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे.

बीड : जिल्ह्यात सुरु असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत दिलेल्या कालावधीत कामे पूर्ण न करणाऱ्या २२ ठेकेदारांना काळ्या यादीत समाविष्ट करण्याची कारवाई सुरु असतानाच आता आणखी ७२ ठेकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे. याबाबतची अंतिम कारणे दाखवा नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांनी बजावली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत केंद्र शासनाचा कालबद्ध कार्यक्रम तसेच मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवस कार्यक्रमातंर्गत विहित कालावधीत ही कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई करण्यात आली आहे. यातील अनेक ठेकेदारांकडे पाचपेक्षा जास्त योजनेच्या कामांचे कंत्राट आहे.

वडवणी तालुक्यातील कामांचे ठेकेदार एम.टी.फड, मे. तेजस इलेक्ट्रिकल्स ॲण्ड सप्लायर्स, परळीचे एस.पी.कन्ट्रक्शन, धारुरचे तुषार साहेबराव बडे, आर.जी. सानप कन्ट्रक्शन, कृष्णाई कन्ट्रक्शन, संतोष पडुळे, विशाल तांदळे, अनंत तुपे, सुजित डोंगरे, , विजय कन्ट्रक्शन, स्वप्नील चौरे, महेश चंदनशिव, शशिकांत कोटुळे, विजय कन्ट्रक्शन, प्रेमकुमार दराडे, अश्विनी कन्ट्रक्शन,वचिष्ठ घुले, अंबाजोगाई तालुक्यातील कामांचे ठेकेदार योगेश चव्हाण, विजय कन्ट्रक्शन,सुरज गित्ते, सांगळे चंद्रकांत, नीलेश मुंडे, शशिकांत कोटुळे, मे. आरोही सोल्युशन्स, आष्टी तालुक्यातील नामदेव घोडके, मे. साबीर कन्ट्रक्शन, मे. अजिंक्य गवसने, एम.टी. फड, राहुल गर्जे , पोपट आबदार, माजलगाव तालुक्यातील स्वप्नील धुमाळ, भागवत शिंदे, भारत शिंदे, प्रगती कन्ट्रक्शन, अन्सारी तारेक नासीर,

गेवराई तालुक्यातील मे.एन.डी. कन्ट्रक्शन, आबासाहेब जाधव, भागवत शिंदे, राजकुमार घुमरे, महादेव फड, राहुल टेकाळे, धनंजय नामदेव मुंडे, गेवराई मे. प्रगती कन्ट्रक्शन, दादासाहेब खेडकर,जगदंबा कन्ट्रक्शन,शिरुर तालुक्यातील विजय कन्ट्रक्शन, अमोल जायभाये, उदय कन्ट्रक्शन, विवेक पाखरे, मे. आरोही सोलुशन्स, विशाल तांदळे, संग्राम बांगर, मंगेश सानप, बी.व्ही.चव्हाण, पाटोदा तालुक्यातील कामांचे ठेकेदार विजय कन्ट्रक्शन, मे. आरोही सोलुशन्स, संकेत तांदळे, मे. साबीर कन्ट्रक्शन, विजय कन्ट्रक्शन, राणी शिवाजी जाधव, पांडुरंग नेमाने, जगदंबा कन्ट्रक्शन, बीड तालुक्यातील ठेकेदार उदय कन्ट्रक्शन, अक्षय शिंदे, अनिकेत चव्हाण, शशिकांत कोटुळे, एस.पी.कन्ट्रक्शन, शिवाजी चव्हाण , एम.टी. फड या कंत्राटदारांकडे १०१ गावांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम आहे. या कामांना विलंब केल्याप्रकरणी ७२ ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.

चिचोंटी, लोणवळ,बावी, खडकी,खंडोबाचीवाडी, हिवरा गोवर्धन, आड हिंगणी, देवदहिफळ, खोडास, , हिंगणी, नांदूर घाट, तांबवा, आवसगाव, धर्माळा,नरनळी, कानडी माळी,चंदन सावरगाव, बनकरंजा, उंदरी, चिंचोळी माळी, कोठी, कासारी, गडल्याचीवाडी, बोरी सावरगाव,वाघेबाभुळगाव, सारणी सांगवी, नागझरी, सारुळ, शिरपूर, येल्डा, हिवरा, दत्तपूर, मुळेगाव, अंबलवाडी, अकोला,तडोळा, माकेगाव, बाळेवाडी, देवीनिमगाव, बीडसांगवी, खुंटेफळ पुंडी, अंभोरा, बिरंगळवाडी,जळगाव, दैठणा, कारखेल, राळेसांगवी, पिंपळसुट्टी, गोदावरी तांडा,डुब्बाथडी, गुंजथडी, सिमरी पाल, लवूळ नं.२, शिंदखेड, कुंभेजळगाव, शिंपेगाव, रुई रानमळा, महारटाकळी, जातेगाव, काजळ्याची वाडी, गोपतपिंपळगाव, माळहिवरा, धानोरा, बोरगाव, रामनगर, झापेवाडी, उंबरमुळी, पिंपळनेर, पाडळी, मातोरी, लिंबा, भडखेल, ब्रम्हनाथ येळंब, खोकरमोहा, निरगुडी, सुप्पा,धनगर जवळका, मांडवेवाडी, नागेशवाडी, वाघाचा वाडा, पिंपळवाडी, बेडुकवाडी, भायाळा, भुरेवाडी, महेंद्रवाडी, मंझेरी घाट,रोहतवाडी, आहेर वाडगाव, कर्झनी, परभणी, पालसिंगन, पिंपळवाडी,मौजवाडी, अवलपूर सोनगाव,पारगाव सिरस,हिवरापहाडी, सात्रा-चांदणी व निवडूंगवाडी, सावरगाव घाट, दहिफळ या गावांच्या पाणीपुरवठा योजना दिलेल्या १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाल्या नाहीत.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी