शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत ‘आयपीएल’वर सट्टा; पाच ताब्यात, एक फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:48 IST

शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.

अंबाजोगाई : शहरातील नागझरी परीसरात एका घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत सुुरु असलेल्या आयपीएल सट्ट्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. यामध्ये पाच सट्टेबाजांना ताब्यात घेतले तर एक फरार आहे. या कारवाईत १ लाख ४५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीस अधीक्षांच्या विषेश पथकास नागझरी परीसरात राजस्थान रॉयल व कोलकता नाईट रायडर्स या संघात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली. यावेळी पथकाने टाकलेल्या छाप्यात आरोपी गोलाकर बसून मोबाईल फोनवर क्रिकेट सामन्यावर सट्टा घेत असल्याचे दिसून आले. यावेळी श्रीकांत गोपाळराव धायगुडे, राम नंदकिशोर मुळे, अभिषेक संतोषराव कदम, महेश सतिष बलूतकर, उत्तम ज्ञानोबा हांगे या पाच सट्टेबाजांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारावाईत आरोपीकडून १ लाख ३८ हजार किंमतीचे १७ मोबाईल फोन आणि नगदी ७ हजार ७२० रुपये असा एकुण १ लाख ४५ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हे सर्व आरोपी सट्टा घेऊन मनोजकुमार साहीलकुमार कालीया याला फोनवर सांगत होते. मनोजकुमार कालिया पोलिसांना गुंगारा देवून फरार झाला आहे. पोउपनि रामकृष्ण सागडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ठाण्यात गुन्हा नोंद आहे. ही कारवाई एसपी जी.श्रीधर, अ.अधीक्षक अजित बोºहाडे, विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील रामकृष्ण सागडे, पांडुरंग देवकते, अंकुश वरपे, गणेश नवले, रेवननाथ दुधाने, जयराम उबे, सावंत आदींनी केली.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसIPL 2019आयपीएल 2019Crime Newsगुन्हेगारी