शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटचा तपास संथ; विधानसभेतील बैठकीत मुख्यमंत्री ‘सीआयडी’वर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 12:19 IST

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत.

मुंबई/बीड : ज्ञानराधा मल्टिस्टेटने जादा व्याजदराचे आमिष दाखवून बीडसह राज्यभरातील लाखो लोकांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बुडवल्या. याच अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानभवनात बैठक घेतली. यात सीआयडीचा संथ तपास पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करत कान टोचले. तसेच बहुराज्य सहकारी संस्था नियंत्रक विभागामार्फत सोसायटीच्या २३८ मालमत्ता जप्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवा, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे बीड जिल्ह्यात ८७ गुन्हे दाखल आहेत. असेच गुन्हे छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, नांदेडसह इतर जिल्ह्यांतही दाखल आहेत. सुरुवातीला बीडमधील गुन्ह्यांचा तपास बीड पोलिसांनी करून ८० मालमत्ता जप्त केल्या. तसेच अध्यक्ष सुरेश कुटे, उपाध्यक्ष वसंत कुलकर्णीसह एकूण १० आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यानंतर या प्रकरणात एमपीआयडी प्रस्तावही दाखल केला. परंतु एप्रिल २०२५ मध्ये हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला अन् त्याला संथ गती आली. त्यामुळेच फडणवीस यांनी ही बैठक घेतली. याला मंत्री, आमदारांची उपस्थिती होती.

अर्चना कुठे बैठका घेतात, तरी का सापडत नाहीत?सुरेश कुटे याची पत्नी अर्चना कुटेला फरार घोषित केले आहे. ती ऑनलाइन बैठका घेते, तरीही पोलिसांना का सापडत नाही? असा सवाल बीडमधील आमदारांनी उपस्थित केला. तसेच फरार १९ आरोपी सापडत नसल्यानेही मुख्यमंत्र्यांनी तपास यंत्रणेला खडेबोल सुनावले.

वरिष्ठ अधिकारी अनुपस्थितमुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्यानंतरही सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हते. सीआयडीला या प्रकरणाचे गांभीर्य नाही. यामुळे लोक आक्रमक होत असून सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. सरकारला कोणालाही पाठीशी घालायचे नाही, असे म्हणत फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.

सीआयडीचे अधिकारी माहिती देत नाहीतबीड पोलिसांकडे तपास होता, तोपर्यंत ते ठेवीदार आणि माध्यमांना माहिती देत होते. परंतु सीआयडीचे पथक गोपनियतेच्या नावाखाली कोणालाच माहिती देत नाहीत. त्यामुळे ठेवीदार हे आमदारांकडे धाव घेतात. अशाच तक्रारी वाढल्याने सर्व आमदारांच्या मागणीवरून सहकार विभागाने ही बैठक बोलावली होती. यात मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे तपासावर नाराजी व्यक्त करत गतीने तपास करण्याच्या सूचना केल्या. हा तपास सीआयडीऐवजी बीड पोलिसांकडेच ठेवा, अशी मागणीही एका आमदाराने केल्याचे समजते.

एकत्रित बैठक घ्याबीड जिल्ह्यातील सर्व मल्टिस्टेट सोसायट्यांच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागांनी एकत्रित बैठक घेऊन सविस्तर अहवाल सादर करावा. फसवणूक झालेल्या ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी ही कारवाई आवश्यक असून, या प्रकरणांमध्ये कठोर आणि वेळेत निर्णय घेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस