Mahadev Munde ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरण गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे. देशमुख यांच्या हत्येला दोन महिने पूर्ण झाली आहेत. तर दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्यात यावा अन्यथा मुख्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिसांकडे केली आहे.
महादेव मुंडे यांची हत्या होऊन १४ महिने उलटले आहेत. पण, तरीही तपास होत नसल्याचा खुलासा झाला आहे.यानंतर आता या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून काढून अंबाजोगाई पोलीस ठाण्याकडे दिला आहे. आता या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
७० पैकी ६७ जागांवर काँग्रेसचे डिपॉझिट जप्त; ‘गोल्डन डक’ची हॅटट्रिक, पण एकच गोष्ट दिलासादायक!
ज्ञानेश्वरी मुंडे म्हणाल्या, 'आमची एवढीच मागणी आहे एसपी साहेबांना, या प्रकरणात तात्काळ एसआयपी आणि सीआयडी द्या. नाहीतर आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करू. याआधीही आम्ही एसपी साहेबांना भेटलो होतो. तेंव्हा तपास अंबाजोगाई पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे सोपवण्यात आला नव्हता. त्यांच्याकडे कोणत्याच गोष्टीचा फॉलोअप मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणात आम्हाला एसआयटी आणि सीआयडी तपास हवा आहे, असंही मुंडे म्हणाल्या.
परळी येथील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी ७.३० ते ८ वाजण्याच्या सुमारास महादेव मुंडे यांची हत्या झाली. १४ महिने उलटूनही आरोपींचा शोध लागलेला नाही. या प्रकरणाच्या तापासात आतापर्यंत चार अधिकारी बदलले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना अनेकवेळा पोलिसांकडे मागणी केली पण, अजूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नाही.