शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पोलीस कर्मचाऱ्यांतील अंतर्गत वाद सोशल मिडीयामुळे झाला ‘सेन्सेटीव्ह’; बीड पोलिसांना करावा लागला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 16:20 IST

बीड पोलिसांनी याची दखल घेत अवघ्या दोन तासात खुलासा केला

बीड : ड्यूटी करण्यावरून दोन कर्मचाऱ्यांमध्ये तु-तु, मैं-मंै, झाली. तसेच एका महिला कर्मचाऱ्याने पोलीस चौकीतच आत्महत्या करण्याचा  प्रयत्न केल्याची पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाली. त्यामुळे प्रकरण सार्वजनिक झाले आणि सर्वांचीच धावपळ उडाली. बीड पोलिसांनी याची दखल घेत अवघ्या दोन तासात खुलासा केला, आणि अफवा थांबविण्याचे आवाहन केले. ‘पोस्ट’ व्हायरल करणारे मात्र, पोलिसांच्या रडावर आहेत. 

लोकसभा निवडणुक काळात जिल्हाधिकारी कार्यालयात गैरप्रकार घडला होता. तेव्हापासून कार्यालयात सर्वत्र बंदोबस्त वाढविण्यात आलेला आहे. गुरूवारी सकाळी मुख्य प्रवेशद्वारावरही बंदोबस्त होता. येथील महिला कर्मचारी प्रवेशद्वारावर न बसता, पोलीस चौकीत जावून बसल्या. यावेळी वरिष्ठ असणाऱ्या हवालदाराने त्यांना गेटवर बसण्याची विनती केली. यातूनच त्यांच्यात तु-तु, मैं-मंै झाली. त्यांनी रागाच्या भरात दरवाजा बंद करून घेतला. सोबतच्या कर्मचाऱ्यांनी हा दरवाजा उघडला आणि त्यांची समजूत काढली. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर महिला कर्मचाऱ्यास पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

दरम्यान, दरवाजा बंद करून महिला कर्मचाऱ्याने ओढणीने गळफास घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या अफवा सोशलमिडीयावर व्हायरल झाल्या. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी उपअधीक्षक भास्कर सावंत, पोनि पुर्भे यांच्याकडून माहिती घेत प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. मात्र हा प्रकार असा काहीही नसून किरकोळ बाचाबाची झाली, असून याची चौकशी लावल्याचे उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी सांगितले.

बदनामी करणाऱ्या विरोधात तक्रार हे प्रकरण सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यामुळे सदरील महिला कर्मचाऱ्याची बदनामी झाली. पसरलेल्या अफवांमुळे त्यांना मानसिक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांविरोधात त्या तक्रार देण्याच्या तयारीत असल्याचेही विश्वसनिय सूत्रांनी सांगितले.

सर्व अफवा आहेत ड्यूटीवरून किरकोळ बोलाबोली झाली. आत्महत्याचा प्रयत्न वगैरे या अफवा आहेत. बोलाबोली का झाली, याची चौकशी करण्यात येत आहे. खोट्या अफवांमुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे. - भास्कर सावंत, पोलीस उपअधीक्षक, बीड

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडSocial Mediaसोशल मीडिया