बीड : पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. बीड जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे नेते गंगाभिषण थावरे यांनी ९ आॅगस्ट रोजी दि. ओरिएन्टल इन्शुअरन्स कंपनीच्या पुणे येथील कार्यालयासमोर आंदोलन केले, त्यानंतर कंपनीच्या अधिकाºयांनी या संदर्भात लेखी आश्वासनपर पत्र दिले.पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत सदर कंपनीने बीड जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा विमा दिला नव्हता. त्यामुळे श्ेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सर्व शेतकरी १७ जून रोजी पुणे येथे टाळे ठोको आंदोलन केले होते. त्यावेळी कंपनीने १७ जुलैपर्यंत सोयाबीन पिकाला भरलेल्या विम्याची रक्कम देण्यात येईल असे सांगितले होते. कंपनीने हा शब्द न पाळला नाही. त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीने सोयाबीन पीक विमा भरलेल्या सर्व शेतकºयांची रक्कम त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी करत ९ आॅगस्ट रोजी आंदोलन केले.दरम्यान, ९ आॅगस्ट रोजी पुणे येथील विमा कंपनी कार्यालयासमोर आंदोलनासाठी थावरे यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी गेले होते. भर पावसात डफडे वाजवत शेतकºयांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यांचा हा रुद्रावतार पाहता कंपनीचे उपमहाप्रबंधक पी. एस. मूर्ती यांनी कार्यालयातून बाहेर येत सदरील आंदोलकांची भेट घेतली. त्यांच्या मागण्या जाणून घेत त्यांच्यासह चर्चा केली. अखेर गंगाभिषण थावरेंसह शेतक-यांनी पुण्यात केलेल्या आंदोलनाला यश आले.अर्ज छाननीनंतर योग्य कार्यवाहीज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या शेतकºयांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सातबारा, ८ अ, बॅँक पासबुक, पंतप्रधान पीक विमा योजना पोर्टल अॅप्लीकेशन या कागदत्रांसह अर्ज कृषी अधीक्षक जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा ओरिएन्टल विमा कंपनीच्या बीड अथवा पुणे येथील कार्यालयात पाठविण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार प्रत्येक अर्जाची छाननी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उपमहाप्रबंधक मूर्ती या वेळी म्हणाले.
‘शेतकरी संघर्ष’चे पुण्यात आंदोलन, विमा कंपनीचे आश्वासन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:35 IST
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत ज्या शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचा एकापेक्षा अधिक वेळा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा (ओव्हर इन्शुअरन्स) नसेल तर त्या श्ेतक-यांना लेखी अर्ज सादर करण्यासाठी ६ सप्टेंबर २०१९ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
‘शेतकरी संघर्ष’चे पुण्यात आंदोलन, विमा कंपनीचे आश्वासन
ठळक मुद्देओव्हर इन्शुअरन्स नसणाऱ्या शेतकऱ्यांना अर्ज करण्यास ६ सप्टेंबरपर्यंत मुदत; अंबाजोगाई, परळीचे पैसे ३ दिवसांत मिळणार