शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केला अपमान; माता मृत्यू प्रकरणी एखंडे कुटुंबाचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 19:06 IST

जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप

बीड : डॉक्टर व परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाला. दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांपुढे गेलो. मात्र, आम्हाला न्याय देण्याऐवजी त्यांनी आमचा अपमान केला, असा आरोप मीरा एखंडे यांच्या कुटुंबियांनी केला आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.

माजलगाव ग्रामीण रुग्णालयात मीरा एखंडे (रा. जिजामाता नगर, माजलगाव) यांचा आठव्या प्रसुतीवेळी बाळासह मृत्यू झाला होता. त्यानंतर मीराचे पती रामेश्वर, ७ मुली, भाऊ रत्नेश्वर घनचक्कर व विविध संघटनांचे पदाधिकारी निवेदन घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले. संबंधित डॉक्टर व परिचारिकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आमची बाजू ऐकून न घेता तुम्ही ८ मुले कशी होऊ देता ? तुम्हीच गुन्हेगार होऊ शकता असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली. जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व पोलिसांकडून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रामेश्वर एखंडे यांनी केला. पत्रकार परिषदेला रामेश्वर यांच्यासह त्यांच्या मुली, मेहुणा, इतर नातेवाईक व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही गर्भपात केलाच नाहीडॉक्टरांनी ७ मुली झाल्यानंतर दोन वेळा गर्भपात केला अशी अफवा उठवली. मात्र, आम्ही एकदाही गर्भपात केलेला नाही. डॉक्टरांकडून खोटी माहिती दिली जात असल्याचा आरोपही रामेश्वर एखंडे यांनी केला.

डॉक्टर साबळेंकडून धमकीघटना घडल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी आम्हाला अरेरावी केली. त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश साबळे हे रुग्णालयात आले. त्यांनीही आम्हाला धमक्या दिल्या. या संदर्भात आम्ही पोलिसात तक्रारही दिल्याचे रामेश्वर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उच्चस्तरीय चौकशी कराया प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सकांऐवजी आरोग्य संचालक किंवा त्यापेक्षा वरिष्ठ स्तरावरुन पारदर्शकपणे चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधितावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंब, नातेवाईकांसह विविध संघटनांना सोबत घेऊन उपोषण करण्याचा इशारा एखंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFamilyपरिवारdoctorडॉक्टर