गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात व्यसनाधीनतेमुळे कलह वाढत
चालले आहेत.
वाळू उपसा थांबवा
बीड : गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावांतून होणाऱ्या वाळू उपशावर वारंवार कारवाया केल्या जात आहेत. तरीही तालुक्यातील गंगावाडी-राजापूर येथील गोदावरी पात्रातून सर्रासपणे अनधिकृत वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
पंपावर पारदर्शक पाइप बसविण्यात यावेत
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाईप पारदर्शक असावा, अशी मागणी होत आहे.