या प्रकाराने पालिकेतील अनेक गैरकारभार चव्हाट्यावर येणार असल्याचे दिसते. शेख खाजामिया शेख इब्राहिम हे १९९८ पासून बीड नगरपालिकेत शिपाई म्हणून कार्यरत आहेत. परंतु, त्यांना १५ नोव्हेंबर २०१३ पासून तोंडी आदेशाने कमी केले. त्यामुळे त्यांनी कामगार न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने ११ डिसेंबर २०१४ रोजी आदेश देत शेख यांना कामावर रूजू करून घेण्यासह थकीत वेतन देण्यास सांगितले. परंतु, तरीही मुख्याधिकारी व गणेश पगारे यांनी त्यांना रुजू करून घेतले नाही. त्यामुळे शेख यांनी विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर प्रादेशिक उपसंचालकांनी याची गंभीर दखल घेत बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. या प्रकाराने बीड पालिकेतील अनुकंपा भरतीही समोर येणार आहे. आता याची चौकशी कधी पूर्ण होते, हे वेळच ठरवेल.
गुट्टे, पगारे यांची चौकशी करा; जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:32 IST