शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

घरफोड्यात सराईत, १३ गुन्हे अंगावर; भैय्या काळेला आष्टी पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:02 IST

बीड, अहिल्यानगर, परभणी,छत्रपती संभाजीनगर यासह अन्य ठिकाणी १३ गुन्हे दाखल 

- नितीन कांबळेकडा (बीड): दिवसा व रात्री घरफोड्यात माहिर असलेल्या गेवराई तालुक्यातील भैय्या काळेला ( २७ रा.सोनवणे वस्ती चकलंबा ता.गेवराई) आष्टी पोलिसांनी राहत्या घरातून अटक करत बेड्या ठोकल्या आहेत.  त्याच्या अटकेने घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सराईत गुहेगार भैय्या काळेवर विविध जिल्ह्यात १३ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

आष्टी शहरात २५ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या दरम्यान घरफोडी करून सोन्यासह रोख रक्कम चोरीला गेल्याचा सलीम सत्तार खान पठाण याच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटय़ांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्याचा तपास करताना आष्टी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, गेवराई तालुक्यातील भैय्या मंत्री काळे याने ही घरफोडी केली आहे. ही माहिती मिळताच आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रवीण क्षीरसागर, भाऊसाहेब आहेर, नागेश लोमटे,पोलीस अंमलदार मजरूद्दीन सय्यद यांनी बुधवारी रात्री त्याच्या राहत्या घरी धाड टाकून त्याच्या मुसक्या आवळत बेड्या ठोकल्या.

घरफोड्या व जिवे मारण्याचा प्रयत्नसह १३ गुन्हे दाखलअटक आरोपी भैय्या काळेने बीड, अहिल्यानगर, परभणी, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक ठिकाणी घरफोड्या केल्या असून जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला आहे. घरफोड्या व जिवे मारण्याचा प्रयत्न असे १३ गुन्हे त्याच्यावर विविध पोलिस ठाण्यात दाखल आहे. विशेष म्हणजे त्याने दिवसा देखील अनेक घरफोड्या केल्या असल्याची चर्चा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Notorious housebreaker, Bhaiyya Kale, arrested by Ashti police.

Web Summary : Bhaiyya Kale, a housebreaking expert with 13 cases against him, was arrested in a house raid. Police suspect this arrest will solve further crimes, as he has a criminal record across multiple districts.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड