शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

रब्बीत ही बोगसपणा, पेरणी सव्वातीन लाख हेक्टरची अन् पीकविमा काढला साडेपाच लाख हेक्टरचा

By शिरीष शिंदे | Updated: December 30, 2023 16:29 IST

खरीप हंगामात शासकीय जमिनी शेत दाखवून अनेकांनी पीकविमा भरला होता.

बीड : रब्बी हंगामात नैसर्गिक आपत्तीसह इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला आहे. वास्तविक रब्बीचे अंदाजित पेरणी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ३५३ असून, २८ डिसेंबरपर्यंत ३ लाख २० हजार ९४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. परंतु जिल्ह्यातील १२ लाख ३८ हजार ७२ हजार शेतकऱ्यांनी ५ लाख ६७ हजार २८९ हेक्टरचा पीकविमा उतरवला आहे. म्हणजेच २ लाख ४७ हजार १९५ हेक्टरवर अतिरिक्त विमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे अधिकचा पीकविमा कोणी भरला, यासाठी कृषी विभाग व पीकविमा कंपनीला क्षेत्रीय पडताळणी करावी लागणार आहे. 

रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांच्या संरक्षणासाठी पीकविमा भरण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. पीकविमा वेबसाइट हँग होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पीकविमा भरता आला नव्हता. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात पीकविमा भरण्यासाठी जवळपास तीन दिवसांची मुदत वाढवून दिली होती. १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत रब्बी जिरायत व बागायत ज्वारीसाठी शेतकऱ्यांनी विमा भरला. दरम्यान, १५ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. आता विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम आकडेवारी समोर आली असता पुन्हा अतिरिक्त विमा भरल्याचा प्रकार समोर आला आहे. 

पुन्हा घ्यावा लागेल शोधखरीप हंगामात शासकीय जमिनी शेत दाखवून अनेकांनी पीकविमा भरला होता. मागच्या वेळीसुद्धा अतिरिक्त पीकविमा भरल्याचे ‘लोकमत’ ने समोर आणल्यानंतर क्षेत्रीय तपासणी झाली होती. काही मोजक्या लोकांनीच पीकविमा कंपनी व शासनाचा पैसा लाटण्याचा प्रयत्न केला होता. वेळीच हा प्रकार समजून आल्याने अतिरिक्त विमा भरणाऱ्यांचा पीकविमा रद्द करण्यात आला आहे. आता रब्बी हंगामात सुद्धा अतिरिक्त विमा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा कोणी अधिक क्षेत्रावर कोठे विमा भरला, याची पडताळणी करावी लागणार आहे. अशा बोगस शेतकऱ्यांमुळे कृषी विभागासह पीकविमा कंपनीचा पैसा व वेळ वाया जात आहे.

३० टक्के जास्तीचा विमा अपेक्षितएकूण क्षेत्राच्या ३० टक्के जास्तीचा विमा शेतकऱ्यांनी उतरविणे अपेक्षित आहे. एखादा शेतकरी थोडेफार क्षेत्र वाढवून दाखवू शकतो. परंतु त्यापेक्षा अधिकचा विमा हा क्षेत्र वाढवून पैसे लाटण्याचा डाव असल्याचे मानले जाते. खरे तर, ५० एकर, १०० एकर असे क्षेत्र दाखवून विमा भरणारे हे शेतकरी नसतात. हे बाहेर राज्य व जिल्ह्यातील असल्याचे यापूर्वीच्या माहिती मधून समोर आलेले आहे.

अशी आहे पेरणी व विमातालुका- एकूण पेरणी क्षेत्र- पेरणी झालेले क्षेत्र- विमा काढलेले क्षेत्रबीड - ४३८१८-३४०३३-६९१४०पाटोदा - ३५३०५-३०६४४-३८८९०आष्टी - ५७९८४-५२५८६-६३५९९शिरुर-२१८७२-१५५६५-३०५९२माजलगाव-१९०७७-१९८६३-४६२००गेवराई-३४०७६-१९७७५-७८०००धारुर-९४९२-१३६१३-३०८०३वडवणी-४०८५-३९९७-१५७४०अंबाजोगाई-४८०७४-५६६६७-६२७२४केज-३८७६३-६५१८९-७८०५०परळी-१९८०७-८१६२-५३५४५एकूण -३३२३५३-३२००९४-५६७२८९

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा