शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक असाही निषेध! त्रस्त ग्राहकाने गाढवाला बांधून शहरभर फिरवली इलेक्ट्रिक बाईक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 14:04 IST

इलेक्ट्रिक बाईक घेतल्यानंतर सहाच दिवसात बंद पडली

परळी ( बीड ) : येथील ग्राहक सचिन गित्ते यांनी एका  कंपनीकडुन खरेदी केलेली इलेक्ट्रिक बाईक अवघ्या सहा दिवसात बंद पडली. ती काही केल्याने पुन्हा सुरु झालीच नाही. कंपनीकडुन कसलाच रिप्लाय येत नसल्याने त्रस्त ग्राहक गित्ते यांनी बंद पडलेली बाईक गाढवाला बांधत परळीतील रस्त्यावरुन ओढत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला.

परळी येथील व्यापारी सचिन गित्ते यांनी दि.16 सप्टेंबर 2021 रोजी 20 हजार रु.भरत एका कंपनीची ऑनलाईन बुकींग केली. 21 जानेवारी 2022 रोजी उर्वरित 65 हजार रुपये भरल्यानंतर त्यांना 24 मार्च रोजी इलेक्ट्रिक बाईक गित्ते यांच्या ताब्यात देण्यात आली. त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच बाईक बंद पडली. त्यामुळे गित्ते यांनी कंपनीकडे संपर्क साधला. कंपनीचा तंत्रज्ञ येऊनही दुचाकी सुरु झाली नाही. कंपनीकडून हजारो गाड्यांची विक्री होत असताना कुठेच डिलर अथवा तालुका,जिल्हा, विभागीय स्तरावर शोरुम नसल्याने सचिन गित्ते यांनी ग्राहक सेवा केंद्रास व्यथा सांगितली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.

रोख रक्कम मोजून घेतलेली बाईक पडल्याने व कंफनीकडुन कसलाच प्रतिसाद न मिळाल्याने त्रस्त झालेल्या सचिन गित्ते यांनी रविवार दि.24 एप्रिल रोजी सदरील बंद पडलेली बाईक गाढवाने ओढत गांधिगीरी केली. गाढवाच्या पाठीवर सदर कंपनीचा निषेध असलेले फलक लावला. फसव्या कंपनीपासून सावध रहावे, या बाईक खरेदी करु नका असे आवाहन करत गाढवाच्या पाठीमागे बाईक बांधत आगळ्या वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला. 

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरBeedबीड