शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

बीड लोकसभेत १९९६ मध्ये महिलांमध्येच रंगली लढत; कोण होत्या उमेदवार? कोणी मारली बाजी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 16:25 IST

तीन प्रमुख राजकीय पक्षांनी महिला उमेदवार देऊन लढवली होती लोकसभा निवडणूक

- समर्थ भांडबीड : राजकारणात कोणती लाट कधी निर्माण होईल याचा भरवसा नसतो. स्थानिक पातळीवरील लाटेची खात्री करूनच प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडत असतो. असेच चित्र १९९६ च्या बीड लोकसभा निवडणुकीत निर्माण झाले होते. जिल्ह्याच्या राजकारणात महिला कार्यकर्त्या सक्रिय असल्यामुळे महिला उमेदवाराच्या विरोधात पुरुष उमेदवार उभे न करता सर्वच मुख्य राजकीय पक्षांनी महिला उमेदवार उभ्या केल्या होत्या. भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या तिन्ही राजकीय पक्षांनी महिला उमेदवार देत विक्रम रचला होता. त्यानंतर आजपर्यंत अशाप्रकारची परिस्थिती निर्माण झालेली नाही.

कोण होत्या महिला उमेदवार, किती मते? रजनी पाटील, २७९९९५ केशरकाकू क्षीरसागर, २२२५३५ सुशीला मोराळे, ७३९०० 

कोण विजयी? १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत सर्वच प्रमुख मुख्य राजकीय पक्षांनी महिला उमेदवार दिल्या. तसेच जवळपास सर्वच महिला उमेदवारांनी लाखाच्या आसपास मते मिळविली होती. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार रजनी अशोकराव पाटील यांचा ५७ हजार ४६० मतांनी विजयी झाल्या होत्या. दरम्यान, महिला उमेदवारांमध्ये निवडणूक झाल्याने ही निवडणूक सर्वांच्याच लक्षात राहिली आहे.

अपक्ष पुरुष उमेदवार..लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्य राजकीय पक्षांनी जरी महिला उमेदवार दिल्या असल्या तरी दोन अपक्ष पुरुषांनीही ही निवडणूक लढवली. सुधाकर पाटील व नारायण कोळपुसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. दोन्ही उमेदवारांना १५ हजारांच्या आत मते मिळाली होती. तर १४ हजार १२४ मते अवैध ठरली होती.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४