शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल कुठून आणणार? दररोज 7 किमी सायकलप्रवास; १० वर्षीय गणेशची शिकण्याची जिद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 05:40 IST

गणेशची शिक्षणाबद्दलची आवड लक्षात घेत त्याच्या शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांनी त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरू ठेवली आहे.   

- अविनाश मुडेगांवकर       अंबाजोगाई (जि. बीड) : वडील अपंग... आई शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. जिथे हाता-तोंडाचा कसाबसा मेळ लागतो त्या कुटुंबातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल कुठून उपलब्ध होणार? मात्र, अशाही स्थितीत गणेश सुधाकर पन्हाळे हा १० वर्षांचा चौथीतला विद्यार्थी दररोज ७ किलोमीटर सायकलने प्रवास करीत शिक्षण घेत आहे. तो ममदापूर येथील संभाजीराव बडगिरे प्राथमिक विद्यालयात शिकत आहे. गणेशची शिक्षणाबद्दलची ही आवड लक्षात घेत त्याच्या शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांनी त्याच्या एकट्यासाठी शाळा सुरू ठेवली आहे.   गणेश दुसरीत असताना कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले.  मोबाईलअभावी तो ऑनलाईन शिक्षणापासून दुरावला. अशा मुलांचं शैक्षणिक वास्तव लक्षात घेऊन संभाजीराव बडगिरे विद्यालयाने मागील वर्षीचा अभ्यासक्रम ऑफलाईन पद्धतीने पूर्ण करूनच पुढील वर्षाचे अध्यापन सुरू केले. त्यामुळे गणेश परत शिक्षणाच्या प्रवाहात आला. मात्र आता  ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा शाळा बंद झाल्या. शाळेतील इतर मुले ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेऊ लागली. मात्र साधनांच्या व्यवस्थेअभावी गणेश ऑनलाईन शिक्षणात सहभागी होऊ शकत नव्हता. गणेश दररोज सकाळी शाळेत येतो. सात किलोमीटरचा येण्याजाण्याचा प्रवास करून घरी परततो. एवढंच नाही, तर पुन्हा शेतातील गाईला चारापाणी पाहण्यासाठी शेतात जाऊन आई-वडिलांना मदत करतो. कडाक्याची थंडी असो वा दाट धुक्याने वेढलेला रस्ता त्याचा दिनक्रम चुकत नाही.शिकण्याची जिद्द : मला शिकायचं आहे, या ओढीने शाळेसाठी गणेशचा दररोज सुरू असलेला हा सायकलवरचा प्रवास कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या आव्हानांना अधोरेखित करणारादेखील आहे. परिस्थितीअभावी असे अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर तर जात नाहीत ना? याचा  विचार करणे गरजेचे आहे.आईची साद गुरुजींनी ऐकलीएका बाजूला गणेशचे शिक्षण थांबतेय ही भीती, तर दुसरीकडे नको त्या संगतीमध्ये जाईल ही चिंता वाटल्याने गणेशच्या आईने शाळेचे समन्वयक प्रीतम पन्हाळे यांच्याशी संपर्क साधत गणेशसाठी काहीतरी व्यवस्था करावी, अशी विनंती केली. मुलाच्या भवितव्याचा विचार करून तुम्ही त्याला शाळेत नियमित सोडलं तर मी जबाबदारी घेईन, असे आश्वासन गुरुजींनी दिले. दुसऱ्या दिवसापासून पन्हाळे यांनी स्वतःचे अकरावी, बारावीचे अध्यापन सांभाळत गणेशला एकट्याला नियमित शिकविणे सुरू ठेवले.