शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

प्रभाव लोकमतचा : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 13:00 IST

२९९१ उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार 

ठळक मुद्देराज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तांनी दिल्या सुचना एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.७६२ जागा अद्यापही रिक्तच

- सोमनाथ खताळ

बीड : राज्याच्या आरोग्य विभागात सर्वत्र प्रभारीराज असल्यामुळे आरोग्य सेवाच आजारी असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणले होते. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आणि ८७७ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासंदर्भात आयुक्त डॉ.अनुपकुमार यादव यांनी सुचना केल्या. २९९१ उमेदवारांची गुणवत्ता यादीही तयार झाली असून आता लवकरच मुलाखती होणार आहेत. यामुळे एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ५४ हजार २६३ पैकी १५ हजार २६४ जागा रिक्त आहेत.  यामध्ये वर्ग १ च्या १०८७ तर गट अ वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ७७८९ पैकी १६३९ जागा रिक्त आहेत. ही बाब ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी ‘प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणा आजारी’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणली होती. त्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक डॉ.अनुपकुमार यादव यांनी तात्काळ पत्र काढून ८७७ जागा भरण्याच्या सुचना दिल्या. यासाठी पात्र असलेल्या २९९१ उमेदवारांची गुणवत्ता यादीही तयार केली आहे. आता केवळ मुलाखती घेणे बाकी आहे. हे सर्व डॉक्टर प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रूग्णालयाच्या ठिकाणी रूजू होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

( प्रभारीराजमुळे राज्याची आरोग्य यंत्रणाच पडली आजारी )

७६२ जागा अद्यापही रिक्तचगट अ वर्ग २ च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागा भरल्या तरी आणखी ७६२ जागा रिक्त राहणारच आहेत. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुधारण्यास अडचणी येतील. या जागांसंदर्भात तात्काळ निर्णय घेऊन त्या भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी जागा रिक्त आहेत, मात्र तांत्रीकदृष्ट्या त्या दिसत नाहीत. या रिक्त जागांवरील एमओंची सेवा समाप्त करून नवीन डॉक्टर नियूक्तीचे आदेश देणे गरजेचे आहे.

समुपदेशनाने करावी पदस्थापनामनासारखे ठिकाण अथवा पदवी शिक्षण घ्यावयाचे असल्याने अनेक एमबीबीएस उमेदवार नौकरीचा राजीनामा देतात. त्यामुळे आता भरती केली जाणाऱ्या डॉक्टरांचे समुपदेशन करून त्यांना पदस्थापना देणे गरजेचे आहे. त्यामुळे रिक्त जागांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. 

राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बुरे दिन; वर्ग एकच्या १०८७ जागा रिक्त )

‘लोकमत’ने उठविला आवाजआरोग्य विभागाच्या योजनांची अंमलबजावणी होण्यास आणि यंत्रणा आजारी होण्यास काय कारणे आहेत? याची सविस्तर माहिती आणि आकडेवारी घेऊन लोकमतने ११ व १४ जुलै रोजी वृत्त प्रकाशित केले होते. यामध्ये संघटना, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या बाजूही समजून घेतल्या होत्या. याच वृत्ताची दखल घेऊन आरोग्य विभागाने तात्काळ जागा भरण्याच्या सुचना दिल्या.

पदोन्नतीसह रिक्त जागांचा प्रश्न लवकर मार्गी लावणे गरजेचे आहे. तसेच गुणवत्ता यादी लागलेल्या उमेदवारांच्या मुलाखती  लवकर घेऊन आणि त्यांचे समुपदेशन करून पदस्थापना द्यावी. अपुऱ्या मनुष्यबळावर काम करताना अनेक अडचणी येत आहेत.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग महाराष्ट्र

टॅग्स :doctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकारBeedबीड