शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात ११ विलगीकरण कक्षाची तातडीने उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 23:24 IST

कोरोना प्रादुभार्वाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याचे निर्देश : संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याचे नागरिकांना आवाहन

बीड : कोरोना प्रादुभार्वाचाअनुषगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने अकरा ठिकाणी विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. तसेच संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूाचा प्रादुर्भाव होवू नये यादृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राहुल रेखावार, अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी बीड यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम ३३ आणि ६५ अन्वये जिल्ह्यातील खालील ठिकाणी व इमारतींमध्ये कक्ष स्थापन करण्यासाठी अधिग्रहित केल्या आहेत.बीडमधील शासकीय आयटीआय वस्तीगृह, नगर रोड, बीड येथे २०० खाटांची व्यवस्था असलेले कक्ष निर्माण करण्यात येत आहे. त्याच बरोबर इतर तालुक्याच्या ठिकाणी ५० रुग्ण क्षमतेच्या खाटांची व्यवस्था असलेले कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. अंबाजोगाई येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह, केज येथे सामाजिक न्याय भवन मध्ये, वडवणी येथे कस्तुरबा गांधी शासकीय वसतीगृहामध्ये, पाटोदा येथे समाज कल्याण मुलींचे वसतीगृहात, धारूर येथे समग्र शिक्षण मुलींचे वसतीगृहामध्ये, आष्टी येथे आयटीआय कॉलेज बिल्डिंगमध्ये, शिरूर कासार येथे समाज कल्याण मुलींचे वसतीगृहात, परळी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात, गेवराई येथे नगर परिषद मंगल कार्यालय मध्ये, आणि माजलगाव येथे माऊली मंगल कार्यालय मध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे.कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूचे संसर्गात अधिक वाढ होवू न देता त्यावर प्रतिबंधात्मक व पूर्वतयारी योजना आखणे आवश्यक आहे. यामुळे कोरोना विषाणूच्या जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती उद्भवू नये यासाठी पुर्वतयारी करणेत आली आहे.

टॅग्स :BeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस