शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अवैध वाळू वाहतुकीचे ट्रक, ट्रॅक्टर पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:36 IST

तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर ट्रक ही चकलांबा पोलीस ठाण्यात तर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देमहसूल पथकाची कारवाई : १५ लाखांचा ऐवज जप्त

गेवराई : तालुक्यातील राक्षसभुवन, पाथरवाला, गुंतेगाव यासह अनेक भागात गोदावरी पोखरून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा होत आहे. दरम्यान याची माहिती मिळताच गेवराई महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या एका ट्रकसह ट्रँक्टर ताब्यात घेऊन जवळपास १५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर ट्रक ही चकलांबा पोलीस ठाण्यात तर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात लावण्यात आला आहे.गेवराई तालुक्यातील गोदावरी पट्ट्यातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक होत आहे. तसेच वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.त्याचबरोबर शासनाचा देखील मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला जात असल्याने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार गेवराई तहसीलदारांनी पथक नियुक्त केले. दरम्यान बुधवारी रात्री उमापूरचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे, चकलांबा मंडळ अधिक अंगद काशिद, कुरु ळकर, तलाठी ससाणे, ढाकणे यांनी अवैध वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाई केली.यामध्ये विना नंबरचा ट्रक चकलांबा तर ट्रॅक्टर पाथरवाला येथे या महसूल पथकाने पकडून कारवाई केली. असुन जवळपास पंधरा लाखाचा ऐवज जप्त केला. विशेष म्हणजे उमापुरचे मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांनी मंगळवारीच उमापूर मंडळ अधिकारी म्हणून पदभार घेतला होता. त्यानंतर दुसºया दिवशी त्यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.पकडलेल्या दोन्ही वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयात अहवाल देण्यात आला असल्याची माहिती मंडळ अधिकारी सुनील तांबारे यांनी दिली. महसूल पथकाच्या या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणलेआहेत.

टॅग्स :BeedबीडsandवाळूRevenue Departmentमहसूल विभाग