शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी इफ्तारची पंगत; पाटोदा ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 14:01 IST

सर्व गावकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून एकीचा सदेश दिला.

अंबाजोगाई : गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या मंडपामध्ये मुस्लिम बांधवांसाठी इप्तारची पंगत देऊन सामाजिक ऐक्याचा संदेश अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (म ) येथे दरवर्षी प्रमाणे अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी इफ्तारच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून एकीचा सदेश  दिला. पाटोदा येथे रामनवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताह आयोजनाचे हे २९ वे वर्ष आहे. काल्याचे कीर्तन झाल्यानंतर  महाप्रसादासाठी सर्व गावकरी सहभागी होतात. दरम्यान, गावातील मुस्लिम बांधवांसाठी रमजान महिना सुरु असल्याने इफ्तारच्या पंगतिचेही आयोजन ग्रामस्थांनी केले.

यावेळी गावचे सरपंच अविनाश उगले, आनंद स्वामी, हभप उगले महाराज, श्रीकृष्ण तोडकर, अशोक देशमुख, बाळासाहेब जामदार, बालाजी साखरे, चंद्रकांत सर्वदे, गोविंद घोरपडे, वैजेनाथ  तोडकर, होसेकर पडीत, विलास पन्हाळे, विलास पाटील, बलभीम जामदार, मौलाना शाहेद पठाण, हारून पठाण, इब्राहिम शेख, खलील पठाण, अलीम शेख, खाजामिया  पठाण, ताजखा  पठाण, जब्बार पठाण, मुन्शी सय्यद, इलाही पठाण, मुस्तफा शेख, युसूफ पठाण आदी ग्रामस्थांचा सहभाग होता. 

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड