शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरगावी जाताय, तर पोलिसांना माहिती द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 23:58 IST

चोरी, घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कामानिमित्त किंवा काही कारणास्तव जास्त दिवस घर बंद करून कोठे जात असाल, तर याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्या. यामुळे पोलीस तुमच्या घराकडे गस्त वाढवतील. एवढेच नव्हे तर नातेवाईक किंवा विश्वासू शेजाऱ्यांनाही माहिती देऊन काळजी घ्यावी. चोरी, घरफोडी टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन बीड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. यासंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यांनाही सूचना केल्या आहेत.गेवराई तालुक्यातील चकलांबा येथे आणि बीड शहरातील काही चोरी, घरफोडीच्या घटना डोळ्यासमोर ठेवून बीड पोलिसांनी नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात काही सूचना करून आवाहन केले आहे. तसेच पोलिसांकडूनही उपाययोजना केल्या आहेत. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव नागरिक अनेक दिवस घर बंद करून बाहेरगावी जातात. हीच संधी साधून चोरटे हात साफ करून घेत हजारो, लाखोंचा किमती मुद्देमाल घेऊन पसार होतात. तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस काही नागरिक गरमीमुळे छतावर, घरासमोरील पटांगणात अथवा इतरत्र कोठेतरी झोपतात. यावेळी घराकडे थोडे दुर्लक्ष होते. याचाच फायदा घेत चोरी, घरफोडी सारखे गुन्हे करण्यात चोरटे यशस्वी होतात. हे टाळण्यासाठी आणि गुन्हेगारी बंद करण्यासाठी नागरिकांनीच आता सतर्क राहणे गरजेचे आहे. जास्त दिवस बाहेरगावी जात असल्यास जवळचे पोलीस ठाणे, चौकी किंवा नातेवाईक, शेजारच्यांना माहिती द्यावी. यामुळे पोलीसही गस्त वाढवतील आणि जवळचे लोकही घराकडे लक्ष देतील. यामुळे चोरी सारखे गुन्हे टळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अडचण वाटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी केले आहे.पोलीस डायरीत होणार नोंदजे लोक घर बंद करून बाहेर जाणार आहेत, त्यांची पोलीस डायरीत नोंद केली जाणार आहे. या परिसरात पोलीस गस्त वाढवतील. तसेच नागरिकांनीही परत आल्यावर पोलिसांना माहिती देणे बंधनकारक राहील. याबाबत ठाणे प्रमुखांना आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी सूचना केल्या आहेत.

टॅग्स :ThiefचोरBeed policeबीड पोलीस