शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 03:39 IST

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

बीड : शेतकऱ्यांना अनुदान नाही, पीकविमा नाही, मराठा, धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण मिळत नाही. कैकाडी, महादेव कोळी, गरिबांना काही दिले जात नाही, बंजारा समाजाला प्रवर्ग दिला जात नाही, आचारसंहिता लागायच्या आत जनतेच्या मागण्यांची अंमलबजावणी करा,  असे आव्हान  देत मराठा योद्धा मनोज जरांगे यांनी ‘ए सरकार म्हणत दंड थोपटले. या राज्यासाठी झिजणाऱ्या समाजाचा  खुन्नस ठेवून, डोळ्यात चटणी टाकून अपमान केला तर उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत आपली भूमिका आचारसंहितेनंतर  स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगड येथे शनिवारी लाखोंच्या उपस्थितीत पारंपरिक दसरा मेळावा महंत शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, हा समाज राज्यात समुद्रासारखा आहे. तो कधी मग्रुरीत वागला नाही. प्रत्येकाला साथ देण्याचे काम केले. 

समाजाच्या डोळ्यातलं पाणी बघवत नाहीअन्यायाविरुद्ध उठाव करावा लागतो. अडवणूक आणि अन्याय होणार असेल तर उठाव करावाच लागणार, असे  सांगत जरांगे म्हणाले, समाजाचे दारिद्र्य कमी व्हावे म्हणून संघर्ष केला.  मी व माझ्या समाजाने असे कोणते पाप केले? शेतकरी, समाजाने काय केलं? हे कोणी सांगेल का? समाजाच्या डोळ्यातील पाणी बघवत नाही. 

कोणावर अन्याय करायचा नाही, पण समाजावर अन्याय होत असेल तर स्वसंरक्षण करावेच लागेल. या राज्यात न्यायासाठी आंदोलन सुरू आहे. १४ महिन्यांपासून गरिबांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून माझ्यासारखा गरीब झुंजतोय. तुमची लेकरं माेठी व्हावीत, यासाठी एकजुटीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. तुमच्या डोक्यावर गुलाल टाका, दुसऱ्यावर गुलाल टाकायच्या नादात कलंक लागू देऊ नका, समाजाची शान, शक्ती आणि बळ वाढवा, असेही ते म्हणाले. 

आता धक्का लागत नाही का?- आम्ही आरक्षण मागत होतो, तेव्हा धक्का लागत असल्याचे सांगितले जात होते. तुमच्या मागण्या महाविकास आघाडीकडून लिहून घ्या म्हणायचे. आता आरक्षणात १७ जाती घातल्या आहेत. 

- मग या काय त्यांच्याकडून लिहून घेतल्या का? आता आरक्षणाला  धक्का लागत नाही का? गरीब, ओबीसींचा विचार का केला नाही? असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. सरकारने हा निर्णय खुन्नस ठेवून केल्याचे सांगत अन्याय करणार असेल तर समोरच्यांना उखडून फेकावे लागेल, असे जरांगे यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणDasaraदसरा