शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पीआय खाडेंनी घेतला ओळखीचा गैरफायदा, त्यांच्यासाठी लाच स्वीकारणारा तरुण करतो युपीएससी

By सोमनाथ खताळ | Updated: May 20, 2024 11:49 IST

सुभाष रोडवरील कपड्याच्या दुकानात जमा व्हायची लाच रक्कम, दुकानदार तरुणाचे शिक्षणही बुडाले

बीड : आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे याने आपल्या फायद्यासाठी एका सुशिक्षित तरुणाचा बळी दिला आहे. गुन्ह्यातील आरोपी न करण्यासह आराेपींना सहकार्य करण्यासाठी खाडे हे लाचेची रक्कम सुभाष रोडवरील कुशल जैन या कपडा व्यापाऱ्याच्या दुकानात घ्यायचे. अनेक मांडवली देखील याच दुकानात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु लाचेचा गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण घेणाऱ्या तरुण व्यापाऱ्याचे आयुष्य खराब झाले आहे. खाडे यांनी जैन यांच्यासोबत असलेल्या ओळखीचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे.

जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे खाडे याने १ कोटी रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता ५ लाख रुपये घेताना कुशल जैन या खासगी व्यक्तीला पकडले होते. या प्रकरणात खाडेसह सहायक फौजदार आर. बी. जाधवर, कुशल जैन यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. बीडच्या एसीबीने खाडे आणि जाधवर यांच्या घराची झडती घेतली असता मोठे घबाड हाती लागले. खाडे याच्या घरात रोख १ कोटी ८ लाख रुपये, ९७ तोळे सोने आणि साडे पाच किलो चांदी असा मुद्देमाल सापडला. तर जाधवरच्या घरातही रोख रकमेसह २५ तोळे सोने सापडले. या दोघांकडेही एवढी मालमत्ता आली कुठून? याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.

आता कशी नोकरी लागणार?कुशल जैन हा दिल्लीला स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो बीडला आला होता. त्याच्या काही नातेवाईकांची आणि हरिभाऊ खाडे यांची ओळख होती. याचाच गैरफायदा घेत खाडे याने याच दुकानात लाच देण्याचे सांगितले. यामध्ये कुशल जैन हा तरुण अडकला. गुन्हा दाखल झाल्याने आता भविष्यात मोठा अधिकारी कसा होणार? असा प्रश्न आहे. खाडे यांच्यामुळे कुशलचे शैक्षणिक नुकसान झाल्याची चर्चा आहे. त्याला या लाचेच्या रक्कम बाबत फारशी काही माहिती नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. केवळ तक्रारदाराने दिलेले पैसे त्याने स्वीकारले, एवढाच रोल त्याचा असल्याचे समजते.

ठेवीदारांची एसीबी कार्यालयासमोर गर्दीजिजाऊ मल्टिस्टेट प्रकरणात बबन शिंदेसह अध्यक्ष, व्यवस्थापक आणि संचालक मंडळाविरोधात बीड शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बीड शहरासह जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे पैसे बुडवून शिंदे फरार आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. यातच बिल्डरला आरोपी न करण्यासाठी खाडे यांनी १ कोटी रुपयांची मागणी केली. हे समजताच गुरुवारी सकाळी आणि शुक्रवारीही काही ठेवीदारांनी एसीबी कार्यालयासमोर गर्दी केली. उपअधीक्षक शिंदे यांनी त्यांच्याशी संवादही साधला. त्यांना कारवाईची प्रक्रिया समजावून सांगितली. समाधान झाल्यानंतर ठेवीदार तेथून निघून गेले.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीडCrime Newsगुन्हेगारी