शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

‘बघून घेतो’; बीड नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना विनायक मेटेंच्या स्वीय सहायकाची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 19:15 IST

मुख्याधिकाऱ्यांनीही सहायकाला सुनावले खडे बोल

ठळक मुद्देउशिरापर्यंत ठाण्यात नोंद नाही वादाचा व्हिडीओ व्हायरल

बीड : बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना आ.विनायक मेटे यांचे स्वीय सहाय्यक विनोद कवडे यांनी ‘बघून घेतो’ अशी धमकी दिली. हा प्रकार मंगळवारी दुपारी बीड नगर पालिकेत घडला. या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी कोठेही नोंद नव्हती.

मुख्याधिकारी दोरकुळकर हे मंगळवारी दुपारी कार्यालयीन कामकाज करीत होते. याचवेळी कवडे हे आपल्या कार्यकर्त्यांसह तेथे आले. त्यांनी कागदपत्रांची माहिती मुख्याधिकाऱ्यांना विचारली. त्यांनीही दिली. मात्र, बोलता बोलता काही त्रुटींवरून दोघांत शाब्दीक चकमक झाली. याचवेळी कवडे यांनी तोंडून मुख्याधिकाऱ्यांना ‘बघुन घेतो’ अशी धमकी दिली. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनाही राग अनावर झाला आणि ‘काय बघुन घेतो’ असे म्हणत त्यांनीही प्रत्युत्तर दिले. मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात गोंधळ झाल्याचे पाहून आरडाओरडा ऐकून पालिकेतील इतर कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. दोघांचा वाद मिटविला. यामुळे पालिकेचे कामकाजही काही वेळ ठप्प झाले होते. कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेधही नोंदविला आहे. मात्र, या प्रकरणाची रात्री उशिरापर्यंत पोलीस दप्तरी कसलीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले.

वादाचा व्हिडीओ व्हायरलमुख्याधिकारी व स्वीय सहायकांच्या वादाचा व्हिडीओ काही क्षणातच सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी याचा निषेध नोंदवित संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली. बुधवारी संघटना याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत. 

धमकी दिल्याने राग अनावर कागपत्रांच्या त्रुटी असतील तर त्या विचारण्याची पद्धत असते. ‘बघुन घेतो’ अशी धमकी दिल्याने राग अनावर झाला. मात्र, संबंधिताने बिनशर्त माफी मागितली. त्यामुळे मी तक्रार दिली नाही.- रोहिदास दोरकुळकर, मुख्याधिकारी, नगर परिषद बीड

वाद झाले की नाही माहित नाही बीडमधील रस्त्यासाठी १० कोटी रूपयांचा निधी आणला. दोन महिन्यांपासून योग्य ती कार्यवाही करून याचे टेंडर काढा म्हणून विनंती केली. रस्ते झाले तर नागरिकांनाच फायदा होणार आहे. मात्र, त्यांच्याकडून काहीच कार्यवाही केली जात नव्हती. याच संदर्भात माझा स्वीय सहायकही भेटायला गेला होता. वाद झाले किंवा नाही, हे माहिती घेऊन सांगेल.- आ.विनायक मेटे, बीड 

टॅग्स :BeedबीडVinayak Meteविनायक मेटेCrime Newsगुन्हेगारी