शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 23:56 IST

माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.

ठळक मुद्देपरळी येथील सभा। माझी गुणवत्ता जनता ठरवेल

परळी : माझी गुणवत्ता जनता ठरवेल, तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही. खोटेनाटे आरोप करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु, जनतेला खरेखोटे माहीत असल्यामुळे, अशा अफवांवर, आरोपावर कुणीही विश्वास ठेवणार नाही, असे प्रतिपादन भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले. प्रचाराच्या समारोपाची सभा राणी लक्ष्मीबाई टावर चौक येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या की बोलताना सुसंस्कृतपणा असला पाहिजे, नात्यागोत्याचा सन्मान केला पाहिजे, असे म्हणत पंकजा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. हीन पातळीच्या राजकारणावरही त्यांनी कडक शब्दांत टीका केली.यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे अतिशय भावनिक झाल्या होत्या. त्या म्हणाल्या, सध्या राजकारणाची पातळी अतिशय हीन झाली आहे. हे सर्व पाहून मनात राजकारण सोडण्याचाही विचार आला होता पण लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांचे समाजकार्य मला पुढे न्यायचे आहे. त्यांनी माझ्या स्वाधीन केलेल्या जनतेला वाऱ्यावर सोडू शकत नाही. माझी लढाई ही व्यक्ती विरोधात नसुन वृत्ती विरोधात आहे मात्र राष्ट्रवादीने ही लढाई केवळ माझ्याविरुद्ध लढली आहे, असे त्या म्हणाल्या.यावेळी डॉ. अमित पालवे, खा.डॉ प्रितम मुंडे, यश:श्री मुंडे, प्रा. टी पी मुंडे, माजी आमदार हरिभाऊ राठोड, राजेश देशमुख, जुगलिकशोर लोहिया, शिवाजीराव गुट्टे, अशोक जैन, विनोद सामत, शालिनी कराड, दत्ताप्पा इटके, विकासराव डूबे, श्रीहरी मुंडे, जीवराज ढाकणे आदींसह महायुतीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.परळी विकासासाठी वचनबद्धमी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करीत आहे.परळीच्या विकासासाठी मी वचनबद्ध आहे. कुटुंबापेक्षाही जास्त वेळ जनतेसाठी देते तरीहीमाझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो असे पंकजा मुंडे यांंनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीPankaja Mundeपंकजा मुंडे