शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

"मी नेहमीच सर्वांसाठी काम केलं, मला निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित": पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 18:45 IST

बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही.- पंकजा मुंडे

बीड: बीड लोकसभेचा निकाल काय लागणार? याची धाकधूक मला होत नाही. कारण माझ्या हृदयातील हुरहूरीची जागा साहेबांच्या जाण्यानं घेतली, यापेक्षा दुसरे मोठे दुःख माझ्या आयुष्यात असू शकत नाही. आज जिल्हयाला पिढी बिघडविणारे नव्हे तर पिढी घडविणारे नेतृत्व हवे आहे, त्यामुळे उद्या माझा निश्चित विजय होणार याची मला खात्री आहे, असा विश्वास भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज व्यक्त केला.

गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी हजारो कार्यकर्त्यांच्यासह मुंडे कुटुंबीय गोपीनाथ गडावर नतमस्तक झाले. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे आजही आपल्या आचार, विचार आणि श्वासात जिवंत आहेत. मुंडे साहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वंचित, पिडित व सर्व सामान्य वर्गासाठी खर्ची घातलं. अनेक दुर्लक्षित घटकांना, कार्यकर्त्यांना प्रवाहात आणलं. त्यांच्या विचाराचा वारसा आणि वसा जपण, त्यांचं स्वप्न पूर्ण करणं हे माझं दायित्व आहे. मी कधीही हा वसा खाली ठेवणार नाही, असा संकल्प पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

मी सर्वांसाठी काम केले, उद्या विजय निश्चिततसेच बीड लोकसभा निकालावर देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी मोकळेपणाने मत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, बावीस वर्षे राजकारणात काम करत असताना मी कधी संयम ढळू दिला नाही. प्रत्येकांना सोबत घेऊन काम केलं. मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही. समाजातील कुठल्या वर्गाला, वर्णाला शब्दाने घायाळ केलं नाही. मी नेहमीच जातीपातीच्या पलिकडे जावून सर्व वर्गांसाठी काम केलं आणि पुढेही करत राहणार. यामुळे मला उद्याच्या निकालाची धाकधूक नाही, विजय निश्चित आहे, असा विश्वास देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यकउद्याच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हॅटट्रिक करणार यात कसलीही शंका नाही. कन्याकुमारी येथे ज्याठिकाणी मोदींनी ध्यान केलं त्या स्वामी विवेकानंदांचे वाक्य आहे. 'जितना कठीण संघर्ष होगा, जीत उतनीही शानदार होगी'  देशाचं राजकारण आता बदलत आहे. देशाला पुढे नेण्यासाठी, देशाच्या भवितव्यासाठी मोदींचं नेतृत्व आवश्यक आहे. २०४७ पर्यंत देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचं त्यांचं स्वप्न आहे. ज्या मुंडे साहेबांनी पक्ष संघटनेसाठी आपलं उभं आयुष्य वेचलं त्यांच्या पुण्यतिथीच्या दुसर्‍या दिवशी सत्तेची हॅटट्रिक होणं यापेक्षा काय मोठं असेल, हे यश मुंडे साहेबांनी पक्षासाठी केलेल्या कष्टाच आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेbeed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४