शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे...' पंकजा मुंडेंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 21:01 IST

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

परळी: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेल्या सावरगांव येथील दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा  एक व्हिडिओ मोठया प्रमाणावर व्हायरल झाला आहे."मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे.. भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे..वेळेवर पोहोचा..सुरक्षित पोहोचा.."असं आवाहन त्यांनी तमाम भगवान भक्तगण आणि कार्यकर्त्यांना केलं आहे.

या व्हिडिओत पंकजाताईंनी म्हटले आहे, आपला दसरा..आपली परंपरा..कष्टकऱ्यांचा हा दसरा..डोंगरदऱ्यात, कडयाकपारीत राहणाऱ्यांचा हा दसरा.. भगवानबाबांची भक्ती आणि एकजुटीची शक्ती..आपले पावलं आपोआप सावरगांवकडे वळतात.  भगवान भक्तीगडावर दसऱ्याच्या दिवशी सिमोल्लंघनासाठी आपण आतुर होतो. इथे पिण्याचं पाणी आहे का? जेवणाची सोय आहे का? रस्ता तिथपर्यंत जातो का? गाडी कुठे थांबवावी लागेल? किती चालावं लागेल.

या सगळ्या चिंता आपल्या मनात जराही घर करत नाहीत कारण आपण वाट पहात असतो ती आपल्या सर्व लोकांच्या एकत्र येऊन सिमोल्लंघन करण्याची...खूप काही मनात असतं..तिथं जाऊन कुणी बोलतं..कुणी नाही बोलत..पण उर्जा मात्र नक्की घेऊन जातं. आपल्या भक्तीची आणि शक्तीची परंपरा..अशीच उज्ज्वल राखण्याची. आपल्या सगळ्यांच्या ओढीने मी पण तिथे येत आहे. भगवान बाबांचे आशीर्वाद आणि तुमच्या प्रचंड घोषणांमधून मिळणारी उर्जा वर्षभर पुरते, मलाही आणि तुम्हालाही... मी तुमच्या दर्शनासाठी येत आहे, भगवानबाबांच्या आशीर्वादासाठी येत आहे..तुमच्या प्रतिक्षेत राहिल...जरूर या..५ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तीगड सावरगांव येथे..वेळेवर पोहोचा..सुरक्षित पोहोचा..असं आवाहन पंकजाताईंनी केलं आहे.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेBeedबीडDasaraदसरा