शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिमणी - कावळ्याच्या झुंजीत दोन झोपड्या खाक; तीन घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 14:07 IST

हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले.

अंबाजोगाई (बीड ) : तालुक्यातील हातोला येथे आज दुपारी १२ वाजता झोपडपट्टीला लागलेल्या आगीत दोन झोपड्या जाळून खाक झाल्या तर तीन घरांचे अतोनात नुकसान झाले. विजेच्या तारांवरील चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या उडाल्या यात झोपड्यांनी पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

हातोला गावाने वाॅटरकप स्पर्धेत भाग घेतलेला आहे. आज सकाळचे श्रमदान आटोपून लोक गावात आलेले होते. महिला घरांकडे गेल्या होत्या, तर पुरुष लोक गावातील मंदिरासमोर थांबले होते. त्याचवेळी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गावातील काही झोपड्यांना आग लागल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. वाळलेल्या कुडांमुळे आणि कडक उन्हामुळे क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. श्रमदान करून आल्यामुळे सरपंच जयसिंग चव्हाण आणि बहुतांशी ग्रामस्थ गावातच होते, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत माती आणि पाण्याच्या साह्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अखेर अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत सुंदर नागोराव पंडित आणि महादेव पिराजी दासूद या दोघांच्या झोपड्या पूर्णपणे जाळून भस्मसात झाल्या होत्या. तसेच प्रभावती लिंबराज माने, विठ्ठल इराप्पा लोखंडे, छायाबाई विलास गायकवाड यांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आग लागल्याचे पाहताच झोपड्या शेजारच्या घरातील ग्रामस्थांनी भीतीने गॅस सिलेंडर घराबाहेर आणून टाकले. या दुर्घटनेत सुदैवाने कसलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पाच कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दोन कुटुंबे तर अक्षरशः उघड्यावर आली आहेत.

चिमणी -कावळ्याच्या झुंजीने लागली आग दरम्यान, सदरील आग चिमणी-कावळ्याच्या झुंजीमुळे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. झोपड्याजवळून गेलेल्या विजेच्या मुख्य तारांवर चिमणी आणि कावळ्याची झुंज सुरु होती. त्यामुळे हेलकावे खावून तारा एकमेकांना घासल्याने स्पार्किंग झाली आणि ठिणग्या उडून खाली वाळलेल्या गवतावर पडल्या. आधीच उन्हामुळे तापलेल्या गवताने ठिणग्यामुळे लागलीच पेट घेतला आणि आग पसरून झोपड्यापर्यंत पोचली. तारांच्या स्पार्किंगमुळे दुर्घटनेस कारणीभूत ठरलेला कावळा देखील यात ठार झाला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAmbajogaiअंबाजोगाईfireआग