शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात कारच्या धडकेत पती ठार; पत्नी गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 01:01 IST

बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास लग्नासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून एकजण जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवडवणी : बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास लग्नासाठी दुचाकीवर निघालेल्या दाम्पत्याला भरधाव कारने धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून एकजण जागीच ठार झाला तर महिला गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दत्ता बालासाहेब शिंदे (३५) व विद्या दत्ता शिंदे (रा. वडी, ता. पाथरी) हे वडवणी तालुक्यातील उपळी येथे लग्न समारंभाला दुचाकीवरून (एमएच २२ के ३१५४) जात होते. बीड - परळी हायवेवर कुप्पानजीक वळणावर समोरून भरधाव आलेल्या कार (एमएच ४८ एस २०३३) ने जबर धडक दिली.

यामध्ये दुचाकीवरील दत्ता शिंदे दुरवर फेकले गेले. त्यामुळे ते जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी विद्या ही गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वडवणी ठाण्याचे संजय राठोड, बी.एन.शिंदे हे घटनास्थळी पोहचले. जखमीला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना घडताच गाडीचालक फरार झाला असून, मयताला पोलिसांनी शवविच्छेदनासाठी कुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातMarathwadaमराठवाडा