शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

पत्नीचा मृतदेह ठाण्यात आणून पती पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:04 IST

कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीला गेलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने एक दिवस उशिरा सासरच्या लोकांना कळविली. त्यानंतर जेव्हा नातेवाईक कोल्हापूरकडे निघाले, तेव्हा एका रुग्णवाहिकेमध्ये पत्नीचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून तो माराच्या भितीने पसार झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : कोल्हापूर जिल्ह्यात ऊस तोडीला गेलेल्या पत्नीचा मृत्यू झाल्याची माहिती पतीने एक दिवस उशिरा सासरच्या लोकांना कळविली. त्यानंतर जेव्हा नातेवाईक कोल्हापूरकडे निघाले, तेव्हा एका रुग्णवाहिकेमध्ये पत्नीचा मृतदेह थेट गेवराई पोलीस ठाण्यात आणून तो माराच्या भितीने पसार झाला. त्यामुळे महिलेच्या माहेरच्या लोकांनी गेवराई पोलीस ठाण्यात गोंधळ करत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.पोलिसांनी प्रकरण शांतपणे हाताळत पोलिस संरक्षणात मृतदेह मुलीच्या सासरी अंत्यसंस्कारासाठी पाठवला व तेथे अंत्यविधि झाला. हा सर्व प्रकार गेवराई तालुक्यातील शिंदेवाडीत घडला.तालुक्यातील शिंदेवाडी येथील केशव काळे व त्याची पत्नी कविता हे दोघे ऊस तोडणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर भागात काही दिवसांपासून होते. २२ डिसेंबर रोजी कविताचा मृतदेह एका विहिरीमध्ये आढळला. तो तेथील पोलिसांच्या उपस्थितीत बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र याबाबतची माहिती केशव काळे याने कविताच्या माहेरच्या लोकांना त्यादिवशी सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी उशिरा ही माहिती कविताचे माहेर जिरेवाडी येथील बळीराम भावले यांना देण्यात आली. तेव्हा लेकीच्या मृत्यूने दु:खांकित होऊन माहेरचे लोक २४ डिसेंबर रोजी कोल्हापूरकडे निघाले, मात्र त्याची माहिती केशवला झाल्यानंतर त्याने रात्रीतून कविताचा मृतदेह एका रुग्णवाहिकेत टाकून थेट गेवराई ठाणे गाठले. याची माहिती जिरेवाडी येथील नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी मंगळवारी सकाळी पोलिस ठाणे गाठले. केशव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. केशव काळेची गेल्या तीन दिवसांची वर्तवणूक संशयास्पद असल्याने कविताचे माहेरचे लोक अधिकच भडकले. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुन्हाही तेथेच दाखल होईल, असे समजावून सांगत कविताचा मृतदेह पोलिस संरक्षणात शिंदेवाडीत आणला तेथे अंत्यविधी झाला. या प्रकरणी केशव काळे व रुग्णवाहिका चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू