शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बीड जिल्ह्यात ३५ संघटनांचे शेकडो व्यापारी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परकीय थेट गुंतवणूकीमध्ये किरकोळ वस्तूच्या उत्पादन व व्यापारास भारत सरकारने दिलेल्या मान्यतेच्या विरोधात कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी बीड जिल्ह्यातील व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रथमच स्वत:च्या मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळला. शहर व्यापारी महासंघ, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच व्यापाºयांच्या ३५ संघटनांचे पदाधिकारी व ...

ठळक मुद्देमेक इन इंडियाचा नारा कशासाठी ? स्वत:च्या प्रश्नावर प्रथमच व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त बंद, जिल्हा कचेरीवर मूक मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परकीय थेट गुंतवणूकीमध्ये किरकोळ वस्तूच्या उत्पादन व व्यापारास भारत सरकारने दिलेल्या मान्यतेच्या विरोधात कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्सने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी बीड जिल्ह्यातील व्यापाºयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रथमच स्वत:च्या मागण्यांसाठी कडकडीत बंद पाळला. शहर व्यापारी महासंघ, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन तसेच व्यापाºयांच्या ३५ संघटनांचे पदाधिकारी व सभासदांनी एकजुटीचे प्रदर्शन करत शहरातील सारडा कॅपिटलपासून सुभाष रोड, अण्णा भाऊ साठे चौक, बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे मूकमोर्चा काढला. विविध मागण्यांसंदर्भात घोषवाक्यांचे फलक हाती घेवून व्यापारी बांधव मूकमोर्चात सहभागी झाले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष संतोष सोहनी, शहराध्यक्ष विनोद पिंगळे, केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्टचे राज्य उपाध्यक्ष अरूण बरकसे, भास्कर गायकवाड, प्रमोद निनाळ, सुरज लोहिया, विनोद ललवाणी, लईक अहेमद, भास्कर जाधव पदाधिकाºयांनी केली.आयकर, अन्य व्यावसायिक कर असो जबरदस्तीने अथवा कायद्याच्या धाकाने वसूल करण्यासाठी सरकार व्यापाºयांकडे पहात आहे. एका बाजूने मेक इन इंडियाचा नारा द्यायचा तर मागील बाजूने वॉलमार्ट, फ्लिपकार्टसारख्या परदेशी कंपन्यांना देशात प्रवेश द्यायचा. त्यामुळे एकुणच सरकारचे धोरण देशातील व्यापाºयांना घातक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी बीड शहर व्यापारी महासंघाचे अक्षय लड्डा, हरिओम धुप्पड, पारस लुनावत, प्रकाश कानगावकर, भास्कर जाधव, मंगेश लोळगे, राजु तापडीया, महेश शेटे, महेश आदे, जवाहर कांकरिया, अशोक शेटे, बद्रीनारायण जाजू, दिनेश मुंदडा, प्रकाश काळे, सखाराम शेळके, हरि क्षीरसागर, विलास शहागडकर, जितेंद्र कासट, अक्षय समदरीया, लईक अहेमद, भरत झांबरे, सूर्यकांत महाजन, बालाप्रसाद जाजू, ईश्वर घोडके यांच्यासह केमिस्ट असोसिएशनचे सुरेश पवार, ईश्वर मुथ्था, विवेक सोमवंशी, पांडुरंग कुºहे यांच्यासह व्यापारी बहुसंख्येने होते. या मोर्चात सहभागी होत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी पाठींबा दिला.जिल्हाभरातील १६०० औषधी दुकाने बंद४आॅनलाईन फार्मसीविरोधात अखिल भारतीय औषध विक्री संघटनेनेन पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक बंदमध्ये जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक १६०० औषध विक्रेत्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. अत्यावश्यक तसेच गरजुंसाठी शासननिर्देशानुसार उपाययोजना करण्यात आली होती. सर्व औषध विक्रेत्यांचा ब्लॅक ड्रेस कोड लक्षवेधी ठरला.सर्वच दुकाने बंदमुळे दिवसभर शुकशुकाटकिराणा, कापड, गृहपयोगी वस्तु, मोबाईल तसेच मोबाईल अ‍ॅक्सेसरी, इलेक्ट्रीक, इलेक्टॉनिक साहित्य, भांडी, ड्रायफुड, खाद्यवस्तू, फर्निचर, सराफा दुकाने तसेच इतर सर्व प्रतिष्ठाने तसेच सर्व ठोक व किरकोळ दुकाने बंद होती. तर शाळा, महाविद्यालये, भाजी, फळांचा बाजार सुरळीत व शांततेत सुरू होता.

टॅग्स :BeedबीडMarketबाजारStrikeसंप