शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शंभर एकर जमीन अपहार प्रकरण; बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड 'मुन्ना' अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2021 14:45 IST

crime in Beed : या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या, कोणत्या अधिकाऱ्यांना हाताशी धरले याचा मास्टर माइंड कोण याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

ठळक मुद्देया प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल

- नितीन कांबळे

कडा ( बीड ) : आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाहची शंभर एकर जमिन बनावट समंतीपत्राआधारे बळकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ते जामिनावर बाहेर आहेत. दरम्यान, आता या प्रकरणात बनावट दस्तावेज करणारा मास्टर माइंड मनोज उर्फ'मुन्ना' रत्नपारखे यास आष्टी पोलिसांनी रविवारी अटक केली.

आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील संत शेख महमंद बाबा दर्गाची जमीन दस्तगीर महमंद शेख महंमद बाबा दर्गा या देवस्थानाच्या सेवेसाठी खिदमत मास  शेख दस्तगीर महंमद यांना प्रदान करण्यात आलेली आहे. शेख कुटुंबीयांकडे ही जमीन वडिलोपार्जित आहे. शेख बाबूलाल, शेख महंमद, शेख हजरत, शेख रशीद, शेख निजाम, शेख दस्तगीर, शेख गुलाब असे मिळून जिमनीची देखभाल करत होते. पण 2020 मध्ये या जमिनीची परस्पर खरेदी झाल्याचे समजात याचा पाठपुरावा करून बनावट व खोटे दस्तावेज निदर्शनास येताच ३ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात सहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात तीन प्राध्यापक, एक मुख्याध्यापक, एक विद्यमान सरपंच व अन्य एकाचा समावेश होता.

हेही वाचा - हृदयद्रावक ! सेफ्टीक टँक स्वच्छ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू

या प्रकरणातील देवस्थानाची जमीन परस्पर खरेदी करण्यासाठी कोणी रसद पुरवली, महसुल दरबारी कोणी चकरा मारल्या, कोणत्या अधिकाऱ्यांला हाताशी धरले, याचा मास्टर माईड कोण? हे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. दरम्यान, आरोपींची पोलिस कोठडी संपताच ते जामिनावर सुटले. तेव्हापासून आष्टी पोलिस जमीन परस्पर नावावर करण्यासाठी बनावट दस्तावेज तयार करणारा यातील मास्टर माइंड असलेला मनोज उर्फ मुन्ना रत्नपारखे ( रा.आष्टी ) याच्या मागावर होते. रविवारी खबऱ्याने आरोपी मुन्ना आष्टी पोलिस ठाणे हद्दीत असल्याची माहिती दिली. यावरून पोलिस निरीक्षक सलिम चाऊस, सचिन कोळेकर, रियाज पठाण, वाहनचालक अरूण कांबळे यांनी सापळा रचून दुपारी ताब्यात घेतले. या प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे ? कोणाची मदत घेतली ? हे मुन्नाच्या तपासातून पुढे येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक सलिम चाऊस यांनी सांगितले.

हेही वाचा - विदारक ! नदीवर पूल नसल्याने रुग्णवाहिका थांबली, अखेर बैलगाडीतून नेला मृतदेह

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड