हॉटेलमध्ये लूटमार करणारी टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:48+5:302021-09-17T04:40:48+5:30

बीड : परळी तालुक्यातील कुंडी फाट्यावरील एका हॉटेलात वेटरवर चाकूने वार करून गल्ल्यातील ३० हजार रुपये घेऊन पळालेल्या टोळीच्या ...

Hotel robbery gang arrested | हॉटेलमध्ये लूटमार करणारी टोळी अटकेत

हॉटेलमध्ये लूटमार करणारी टोळी अटकेत

Next

बीड : परळी तालुक्यातील कुंडी फाट्यावरील एका हॉटेलात वेटरवर चाकूने वार करून गल्ल्यातील ३० हजार रुपये घेऊन पळालेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

सिरसाळा पोलिसांनी १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता त्यांना पकडण्यासाठी नाकाबंदी केली, पण वाहने सुसाट चालवून त्यांनी पोबारा केला त्यानंतर

सोनपेठ फाट्यावर पाठलाग करून पाचजणांना बेड्या ठोकल्या; तर तिघे पळून जाण्यात यशस्वी झाले.

बाबासाहेब वैजीनाथ नागरगोजे (रा. औरंगपूर, ता. परळी) यांचे कुंडी फाट्यावर हॉटेल आहे. १५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेथे एक जीप व दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी धुडगूस घातला. हॉटेलचालक बाबासाहेब यांच्यासह त्यांचे बंधू यांना मारहाण केली; तर वेटरवर चाकूने वार करून साहित्याची मोडतोड करीत गल्ल्यातील ३० हजार रुपये लंपास करून पोबारा केला. दरम्यान, बाबासाहेब नागरगोजे यांनी तातडीने सिरसाळा पोलिसांना कळविले. सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे व सहकाऱ्यांनी सिरसाळा येेथे नाकाबंदी केली. मात्र, या टोळीने जीप व दुचाकी सुसाट नेली. प्रसंगावधान राखत पोलीस रस्त्याच्या बाजूला झाले. त्यानंतर सुसाट निघालेल्या वाहनांचा पाठलाग केला. अखेर सोनपेठ फाट्यावर त्यांना पकडण्यात आले. यावेळी तिघे अंधाराचा फायदा घेत पळून गेले तर पाचजण पोलिसांच्या हाती लागले. विशाल हनुमान जाधव (२०) , सोमनाथ श्रीकिशन आंधळे (१९, दोघे रा. गंगासागरनगर, परळी), दिगांबर शिवाजी घाडगे (३०, रा. पंचवटीनगर, परळी), ज्योतीबा बाबूराव लहाने (२६, रा. तपोवन), अमोल जनार्धन कांगणे (३० रा. कुंडी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून जीप व दुचाकी हस्तगत केली आहे. या प्रकरणी सिरसाळा ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. उपअधीक्षक सुनील जायभाये यांनी घटनास्थळी भेट दिली.

....

तीन दिवसांची पोलीस कोठडी

पाचही आरोपींना सिरसाळा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी परळी न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांनी दिली. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

.....

Web Title: Hotel robbery gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.